पराभवानंतर विराट भडकला, पाहा कोणावर काढला राग

पराभवानंतर विराटने काढला राग...

शैलेश मुसळे | Updated: Apr 30, 2018, 11:27 AM IST
पराभवानंतर विराट भडकला, पाहा कोणावर काढला राग title=

बंगळुरु : आयपीएलच्या ११ व्या सीजनमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये बंगलुरुचा कोलकात्याने पराभव केला. बंगळुरुला होमग्राउंडमध्येच पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसला. हा पराभवानंतर कर्णधार विराट कोहली निराश दिसला. त्याने संपूर्ण टीमवर याचा राग काढला. प्रेजेंटेशनच्या वेळी विराटने म्हटलं की, त्याच्या टीमला विजयाचा हक्कच नव्हता. विराटने नॉटआउट ६८ रनची खेळी केली पण त्याची ही खेळी विजयात रुपांतरीत नाही होऊ शकली. या सामन्यात कोलकात्याच्या क्रिस लिनने नॉटआउट ६२ रनची खेळी केली.

विराटने सामन्यानंतर म्हटलं की, 'या पिचवर जेव्हा ही आम्ही बॅटींग करतो ही पीच आमच्यासाठी काहीतरी सरप्राईजिंग असते. मला वाटलं की १७५ रनचं टार्गेट चांगलं आहे. जर आम्ही चांगली फिल्डींग नाही करत तर आम्हाला विजयाचा कोणताच अधिकार नाही. पुढे जाण्यासाठी आम्हाला अनेक गोष्टी सुधाराव्या लागतील. विराटने पुढे म्हटलं की, 'मी कोणत्याही एका गोष्टील पिन पॉईंट नाही करु शकत. आता आम्हाला ७ पैकी ६ सामने जिंकावे लागतील तरच आम्ही सेमीफायनलमध्ये पोहोचू. पण यासाठी प्रत्येक सामना सेमीफायनल समजून खेळला पाहिजा. प्रत्येक खेळाडूला देखील असंच समजून खेळावं लागेल. मला आशा आहे की, टीममधील खेळाडू ही गोष्ट समजतील.