तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती...?

आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती? हा आपल्यापैकी अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. अर्थात, सर्वच क्रिकेटपटूंचे शिक्षण एकाच वेळी जाणून घेणे तसे कठिण. पण, काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणाबाबत मात्र आपल्याला माहिती मिळू शकते. अशाच काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणावर टाकलेला हा एक कटाक्ष...

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 27, 2017, 07:11 PM IST
तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती...? title=

मुंबई : आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती? हा आपल्यापैकी अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. अर्थात, सर्वच क्रिकेटपटूंचे शिक्षण एकाच वेळी जाणून घेणे तसे कठिण. पण, काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणाबाबत मात्र आपल्याला माहिती मिळू शकते. अशाच काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणावर टाकलेला हा एक कटाक्ष...

विराट कोहली

सध्या भारतीय टीम चांगलीच फॉर्मात आहे. कर्णधार महेंद्र सिंह धोनीकडून सूत्रे हातात घेतल्यावर विद्यमान कर्णधार विराट कोहलीने हा फॉर्म कायम राखला आहे. विराट अनेकदा वादाचा विषय ठरतो. कधी मैदानावर कधी मैदाना बाहेर. पण, तुम्हाला माहिती आहे का विराट कोहली फक्त १२वी पर्यंत शिकलेला आहे.

महेंद्र सिंह धोनी

विराटने ज्या महेंद्रसिंह धोनीकडून कर्णधारपदाची सूत्रे स्विकारली त्याचेही शिक्षण विशेष असे झाले नाही. क्रिकेट विश्वात सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'माही'चे शिक्षण बी.कॉम पर्यंत झाले आहे. सध्या तो कर्णधार नाही. पण, त्याची फलंदाजी आणि यष्टीरक्षण नेत्रदीपक असते.

हार्दिक पांड्या

विक्रमवीर हार्दिक पांड्या तर सध्या चांगलाच जोमात आहे. अलिकडील काळात अनेक सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत विक्रमाला गवसनी घातली आहे. भारतीय संघातला एक स्फोटक फलंदाज अशी ओळख असलेला पांड्या इयत्ता ९ वी नापास आहे. क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करता यावं यासाठी पांड्याने शिक्षण अर्धवट सोडले आहे.

शिखर धवन

आपल्या मिशीचा आकडा पिळत फोटोसाठी खास पोज देणारा आणि नावाला साजेशी खेळी करत मैदानावर हिरो ठरणाऱ्या शिखर धवनचे शिक्षणही अनेकांच्या भूवया उंचवायला लावणारे. धावांचे शिखर उभे करणाऱ्या शिखर धवनला शिक्षणाचे शिखर मात्र फारसे सर करता आले नाही. शिखर धवनचे शिक्षण फक्त १२वी पर्यंत झाले आहे.