IPL 2023 : ...म्हणून CSK च्या पराभवानंतरही धोनीकडे धावत जात गावस्करांनी घेतला ऑटोग्राफ; Video व्हायरल

Sunil Gavaskar Autograph MS Dhoni : महान कसोटी फलंदाज सुनील गावस्कर अजूनही करोडो लोकांचे चाहते आहेत. त्याच्या कॉमेंट्रीचे क्रिकेट चाहते अजूनही वेडे आहेत. पण सुनील गावस्कर स्वत: कोणाचे चाहते आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हीच पाहा व्हिडीओ...

श्वेता चव्हाण | Updated: May 15, 2023, 11:22 AM IST
IPL 2023 : ...म्हणून CSK च्या पराभवानंतरही धोनीकडे धावत जात गावस्करांनी घेतला ऑटोग्राफ; Video व्हायरल  title=
Sunil Gavaskar Autograph MS Dhoni

Sunil Gavaskar and MS Dhoni: आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 61 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा (kkr vs csk) 6 विकेटने पराभव केला. रविवारी (14 मे 2023) एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता विजयसमोर 144 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांन 9 चेंडू राखून पूर्ण केले. मात्र या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला असला तरी चाहते जास्त निराश नव्हते. दरम्यान हा सामना संपल्यानंतर मैदानावर असा एक प्रसंद घडली की ज्याची कल्पना कुणीही केली नसेल.... 

आयपीएलच्या 16 व्या हंगामातील चेन्नई सुपर किंग्जचा त्यांच्या घरच्या मैदानावर लीग टप्प्यातील हा शेवटचा सामना होता. या सामन्यामध्ये चेन्नईला पराभवाला सामारे जावे लागले. परिणामी चेन्नईचे प्लेऑफमधील स्थान ही अस्थिर झाले आहे. तसेच चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा या हंगामातीली शेवटचा सामना होता आणि बहुधा कर्णधार एमएस धोनीसाठीही चेपॉवर हा त्याचा शेवटचा सामना असावा.  यामुळे हा सामना संपल्यानंतर 41 वर्षीय धोनी (MS Dhoni) टेनिस रॅकेट घेऊन मैदानाला गोल फेरी मारत चेन्नईच्या चाहत्यांना जर्सी गिफ्ट केल्या. यादरम्यान हे सर्व गोष्ट सुरु असताना मैदानात धोनीला भेटायला आले ते भारताचे महान फलंदाड सुनील गावस्कर...

वाचा: धोनीची आयपीएलमधून निवृत्ती? कोलकाता विरुद्धच्या पराभवानंतर मैदानात नेमकं काय घडलं?

सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) भेटायला आल्याचे कळताच धोनीही थोडावेळ थांबला. त्यानंतर धोनी आणि गावस्कर यांच्यामध्ये काही काळ बोलणे झाले. त्यानंतर धोनीजवळ त्यांनी शर्टव ऑटोग्राफ मागितला. त्यानंतर धोनीही गावसकरांच्या शर्टवर आपली सही दिली आणि दोघांमध्येही एकच स्मितहास्य पाहायला मिळाले. सही मिळाल्यानंतर गावसकरांनी धोनीला मिठी मारली आणि त्यानंतर शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत आयपीएलमध्ये अशी गोष्ट पाहायला मिळाली नव्हती. 

चेन्नईचा पराभव

केकेआर विरुद्ध चेन्नईच्या रविवारच्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शिवम दुबेच्या नाबाद 48 धावांच्या जोरावर सीएसकेने 144 धावा केल्या. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा डाव फसला होता, मात्र रिंकू सिंग आणि कर्णधार नितीश राणा यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाला विजयापर्यंत नेले. राणाने चौकर मारून संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात राणा आणि रिंकूनने अर्धशतकं ठोकली.