स्वत: हसणारी मिस्ट्री गर्ल सुन्न, असं काय घडलंय पाहा

आपल्या स्माईलने घायाळ करणाऱ्या मिस्ट्री गर्लच्या 'चेहऱ्याचा रंग का उडाला', नेमकं काय घडलं पाहा 

Updated: Apr 5, 2022, 10:19 AM IST
स्वत: हसणारी मिस्ट्री गर्ल सुन्न, असं काय घडलंय पाहा title=

मुंबई: लखनऊ विरुद्ध हैदराबाद सामन्यात नेहमी आपल्या स्माईलने टीमचं मनोबल वाढवणारी मिस्ट्री गर्ल यावेळी मात्र उदास दिसली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून अनेकांची निराशा झाली. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात मिस्ट्री गर्ल सुन्न होती. तिने फक्त वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटचं सेलिब्रेशन केलं. 

लखनऊ विरुद्धच्या सामन्यात हैदराबाद टीमला 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हैदराबादचा हा दुसरा पराभव आहे. सलग दुसऱ्या पराभवामुळे मिस्ट्री गर्ल काव्या मारनचा चेहरा पडल्याचं पाहायला मिळालं. ती स्टेडियममध्ये खूप उदास आणि हताशपणे बसली होती. 

काव्या मारनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत हार्टब्रेक इमोजी शेअर केला आहे. एका युजरने तर यावर कमेंटही केली प्लीज पुढची तरी मॅच जिंका. तर दुसरा युजर म्हणतो यापेक्षा काहीतरी चांगलं अजून घडायला हवं.

चाहते तिच्या चेहरा उदास पाहून हैदराबाद टीमला दोष देत आहेत. तर अनेकांनी हार्टब्रेक इमोजी शेअर केले आहेत. सध्या तिच्या या पडलेल्या चेहऱ्याच्या फोटोंची चर्चा होत आहे.