IND VS SA T20 World Cup : भारत की दक्षिण आफ्रिका? टी20 मध्ये कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

IND VS SA T20 World Cup: अशी असेल टीम इंडिया-दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग XI, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि Match Prediction  

Updated: Oct 28, 2022, 11:01 PM IST
IND VS SA T20 World Cup : भारत की दक्षिण आफ्रिका? टी20 मध्ये कोणाचं पारडं जड? जाणून घ्या title=

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया (Team India) चांगलीच फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये सलग दोन विजय मिळवून पॉईटस् टेबलमध्ये टॉपच स्थान गाठलंय. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कपच्या दिशेने एक एक पाऊल कुच करत आहे. आता टीम इंडियाचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (India vs South Africa) असणार आहे. या सामन्यापुर्वी दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन, पिच रिपोर्ट आणि मॅच प्रेडिक्शन जाणून घेऊयात. 

 हे ही वाचा : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यापुर्वी दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाला मोठा इशारा 

कधी आहे सामना? 

येत्या 30 ऑक्टोंबरला म्हणजेच रविवारी टीम इंडियाचा (Team India) तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना पर्थ क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडियाने पाकिस्तानचा 4 विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा 56 धावांनी पराभव केला. या विजयानंतर टीम इंडिया बी ग्रुपमध्ये टॉप स्थानावर पोहोचली आहे. टीम इंडियाच्या या सलग विजयानंतर आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला (South Africa) पराभूत करून सेमी फायनलमध्ये जागा पक्की करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.  

 पिच रिपोर्ट काय सांगतो? 

पर्थ येथे होणाऱ्या या सामन्यात गोलंदाजांना मोठी मदत मिळू शकते. पर्थच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांच्या बॉलला भरपूर उसळी मिळते. तसेच दुसऱ्या डावात फलंदाजी करणे येथे थोडे सोपे होते. त्यामुळे दोन्हीही संघ टॉस जिंकून फिल्डींग घेण्याचा निर्णय़ घेऊ शकतात. 

मॅच प्रेडिक्शन 

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) आतापर्यंत टी20च्या मैदानात 23 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 13 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने (South Africa)  9 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे या आकडेवारीवरून टीम इंडियाचे पारडे जड वाटतेय. दरम्यान वर्ल्ड कप आधी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला तीन सामन्यांच्या मालिकेतही पराभूत केले होते.
 
दरम्यान या वर्ल्ड कपबद्दल बोलायचं झालं तर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. टीम इंडियाने आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा  (South Africa)  एक सामना रद्द झाला होता, तर दुसरा सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 104 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. आता तिसऱ्या सामन्यात कोण बाजी मारतो, याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे. 

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन 

टीम इंडिया संघ : केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, अश्विन, शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग

दक्षिण आफ्रिका संघ : क्विंटन डीकॉक, टेम्बा बावुमा, रिली रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टियन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, एनरिक नॉर्टजे, कगिसो रबाडा,लुंगी निगिडी