LIVE कार्यक्रमात पोटधरून हसू लागला टीव्ही अँकर, तुफान व्हायरल होतोय Video

Pak VS Zim : सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक न्यूज अँकर हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी सोशल मीडियावर याला पाकिस्तानच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवाशी जोडलं जातंय.

Updated: Oct 28, 2022, 08:07 PM IST
LIVE कार्यक्रमात पोटधरून हसू लागला टीव्ही अँकर, तुफान व्हायरल होतोय Video title=
Trending Video of TV Anchor PAK vs ZIM

Trending Video of TV Anchor:​  ऑस्ट्रेलियात खेळला जाणारा T20 World Cup खूपच रोमांचक मोडवर आला आहे. एकीकडे वेस्ट इंडिजसारखा (West Indies) तगडा संघ स्कॉटलंड आणि आयर्लंडविरुद्ध पराभूत होऊन स्पर्धेतून आऊट झालाय. तर त्याचवेळी नुकत्याच झालेल्या आशिया चषकात सरस कामगिरी करणाऱ्या पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघालाही झिम्बाब्वेकडून (Zimbambw) पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता पाकिस्तानची जगभर नाचक्की होताना दिसते. अनेकांनी पाकिस्तानची सोशल मीडियावर खिल्ली उडवली.

पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर (Socail Media) पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. लहानश्या झिम्बाब्वेकडून पराभव झाल्याने अनेक मीम्स शेअर (Memes) केले जात आहे. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय. व्हिडीओ जुना असला तरी कालच्या मॅचवरून हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

अँकरला हसू आवरेना...

व्हिडिओमध्ये अँकर (TV Anchor) आता स्पोर्ट्सच्या बातम्या वाचणार असल्याचं सांगताना ऐकू येतंय. यानंतर त्याला स्वतःच हसू आवरता आलं नाही. कारण खाली पाकिस्तानचा 1 रनने पराभव झाला, अशी फुटर झळकत असतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरत आहे.

पाहा व्हिडीओ- 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@baghii__writes)

व्हिडीओ नेमका कधीचा?

व्हायरल झालेला हा व्हिडिओ 2020 चा आहे. त्यावेळी हा अँकर फुटबॉलच्या सामन्याचं अँकरिंग करत होता आणि त्याने क्लबचे नाव चुकीचं वाचलं होतं. त्यावेळी ते हसले आणि त्यानंतर त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली आणि आपला कार्यक्रम सुरू ठेवला.

आणखी वाचा- T20 World Cup मध्ये आता 'हा' खेळाडू ओपनिंग करणार? रोहितच्या मनात आहे तरी काय?

दरम्यान, भारत आणि झिम्बॉब्वेकडून झालेल्या पराभवानंतर आता पाकिस्तानच्या सेमिफायनलचं (T20 World Cup Semifinal) स्वप्न आता स्वप्नच राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तानपुढे आता खूप कमी पर्याय शिल्लक आहेत. त्यामुळे आता बाबर सेना कशी कामगिरी करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय