श्रीमंत लाडक्या बहिणींची चिंता वाढली? सक्षम लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे परत घेणार?

Ladaki Bahin: सरसकट लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची चिंता वाढलीय.

Pravin Dabholkar | Updated: Jan 18, 2025, 07:55 PM IST
श्रीमंत लाडक्या बहिणींची चिंता वाढली? सक्षम लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे परत घेणार? title=
लाडकी बहीण

Ladaki Bahin: लाडक्या बहिण योजनेची पडताळणी सरकारन सुरू केलीय. पडताळतीन अपात्र ठरणाऱ्या बहिणींकडून सरकार पैसे परत घेणार आहे.त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता वाढली आहे. काय आहे सरकारची योजना आणि लाडक्या बहिण योजनेची पडताळणी कशी होणार? जाणून घेऊया. 

सरसकट लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची चिंता वाढलीय. कारण सरकारनं लाडक्या बहिण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू केलीय. मात्र त्यापूर्वीच 4 हजारांपेक्षा अधिक सक्षम महिलांनी योजनेतून अर्ज मागे घेतलेय... मात्र सरकारनं सुरू केलेल्या पडताळीत आणखी अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.त्यामुळे अपात्र असलेल्या महिलांनी स्वताहून अर्ज मागे घ्यावेत असं आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी केलंय. अर्ज मागे न घेणाऱ्या महिला पडताळणीत अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून योजनेचे पैसे परत घेतले जाणार असल्याचंही तटकरे म्हणाल्यात.  

महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू आहे. तसेच इतर विभागाकडून अर्जाची छाननी करण्यात येतेय. दरम्यान सरकारच्या नवा नियमावर विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत. मतांसाठी सरसकट अर्ज मंजूर केले आता त्रुटी का काढल्या जात असल्याचा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केलाय. सुरुवातीला लाडक्या बहिण योजनेचा  सव्वा दोन कोटींच्या वर महिलांनी लाभ घेतलाय. मात्र योजनेला नियमांची कात्री लावण्यात आल्यानं लाखो महिला लाभापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे निवडणूक काळात आवडती असणाऱ्या बहिणी निवडणूक संपल्यानंतर नावडत्या झाल्या का? असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जातोय.

आदिती तटकरे काय म्हणाल्या? 

'आम्ही दिलेल्या माहितीनुसार पाच बाबींवर लाडकी बहीण योजनेसाठीच्या अर्जांची पुन:पडताळणी सुरू आहे. जिथं अडीच लाखांहून अधिक कोणाचं उत्पन्न आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यांच्या तक्रारी आल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलिकडे ज्यांच्याकडे चार चाकी वाहनं आहेत त्यांच्यासंबंधीच्या तक्रारी आल्या होत्या. काही महिला लग्न होऊन इतर राज्यांमध्ये वास्तव्यास गेल्या आहेत अशा महिलांचे अर्जही आले आहेत की आम्ही लाभासाठी पात्र नाही. दोन वेळा अर्ज दाखल केल्याच्याही तक्रारी आल्या होत्या. त्यातील बऱ्याच महिलांनी स्वत:हून लाभ परत देण्यास सुरुवात केली आहे', असं म्हणत काही रक्कम डिसेंबर महिन्यात परत आली काही जानेवारी महिन्यात परत येत आहे असं तटकरे म्हणाल्या. सरकारी चलानच्या माध्यमातून ही संपूर्ण सरकारी प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. 

चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरला पण, मान्य केला नाही त्यांचं काय? 

याबबात पूर्वीच माहिती दिल्याचं म्हणत उत्पन्नापलिकडे जाऊन ज्यांनी लाभ घेतला आहे याची तपासणी सध्या सुरू असल्याचं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. योजना सुरु झाली त्या कालावधीत ज्यांना सरकारी नोकरी मिळाली आहे याचीही पडताळणी सुरू असून आहे. एखाद्याला पात्र लाभापलिकडे रक्कम आली असेल तर महिलांनी पुढाकार घेऊन अर्ज मागे घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.  सरकारकडून केल्या जाणाऱ्या या  पुन:पडताळणी  प्रक्रियेमध्ये 'लाडकी बहीण' योजनेत नियमबाह्य पैसे घेतले असल्यास त्यांना त्यासंदर्भात माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीत तो पैसा परत घेतला जाईल, असं त्या म्हणाल्या. यामध्ये सर्व अडीच कोटी लाभार्थी महिला लाभार्थ्यांची पूर्णपणे पुन:पडताळणी करणार नसल्याचं स्पष्ट करत मुळात एक लाखांहून कमी उत्पन्न असणाऱ्या जवळपास दीड कोटींहून अधिक जनतेचाही यामध्ये समावेश असल्यामुळं इथं पुन:पडताळणीचा मुद्दा उपस्थित होतच नाही, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.