Virat Kohli Restaurant: टीम इंडियाच्या (Team India) मिशन टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) ऑस्ट्रेलियात (Australia) सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने दणक्यात सुरुवात केली आहे. पण खरी सुरुवात होणार आहे ती 23 ऑक्टोबरला. भारत आणि पाकिस्तानदरम्यान (India vs Pakistan) हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. करोडो भारतीय क्रिकेट प्रेमींचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे.
भारतीय खेळाडूंची लोकप्रियता
भारतात क्रिकेट हा खेळ प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक भारतीय खेळाडू तरुण वर्गाचे आयकॉन आहेत. आपले आवडत्या खेळाडूंचा लूक, त्यांचे कपडे, त्यांची लाईफस्टाईल जाणून घेण्यात चाहत्यांना उत्सुकता असते. इतकंच काय तर आपल्या आवडत्या खेळाडूंना खाण्याचा पदार्थ आवडतो याबाबतही जाणून घ्यायचं असतं.
खाण्याची विचित्र पद्धत
टीम इंडियातले अनेक खेळाडू भारतीय पद्धतीचंच खाणं पसंत करतात. पण टीम इंडियात एक खेळाडू असा आहे ज्याच्या खाण्याबद्दल टीम इंडियात नेहमीच चर्चा असते. त्या खेळाडूच्या खाण्याच्या विचित्र सवयीचा किस्सा विराट कोहलीने (Virat Kohli) सांगितला आहे. हा किस्सा ऐकून क्रिकेट चाहतेही हैराण झाले आहेत.
विराट कोहली म्हणला 'मी जर कोणाला जेवणात विचित्र कॉम्बिनेशन करताना पाहिलं असेल तर ते म्हणजे ऋद्धिमान साहा (Wriddhiman Saha). आम्ही एकदा जेवत असताना मी त्याच्या प्लेटमध्ये बटर चिकन, रोटी, सॅलड आणि रसगुल्ला पाहिला. त्याने रोटी आणि सलाडचा एक घास खाल्ला आणि त्यानंतर अख्खा एक रसगुल्ला गिळला. मी त्याला विचारलं ऋद्धी तू हे काय करतोयस? यावर त्याने उत्तर दिलं मी असंच जेवतो. अनेकवेळा त्याला डाल-भाताबरोबर आईस्क्रीम खाताना आम्ही बघितलं आहे.
'वाईट जेवणाचा अनुभव'
विराट कोहलीने सर्वात वाईट जेवणाच्या अनुभवाबद्दलही किस्सा सांगितला आहे. 'अलीकडेच मी पॅरिसला गेलो होतो, जिथे मला सर्वात वाईट अनुभव आला. शाकाहारी लोकांसाठी हे एक भयानक स्वप्न आहे. तर आपण सर्वोत्तम जेवण भूतानमध्ये खाल्ल्याचं विराटने सांगितलं. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या आणि भात हे सर्वोत्तम जेवण असल्याचं त्याने सांगितलं.