T-20 World Cup सुरू होताच 'हा' संघ झाला स्पर्धेच्या बाहेर

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी,  'या' संघाने धरला घरचा रस्ता!

Updated: Oct 18, 2022, 08:18 PM IST
 T-20 World Cup सुरू होताच 'हा' संघ झाला स्पर्धेच्या बाहेर title=

T-20 World Cup 2022 : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरूवात झाली असून सुरूवातीच्या सामन्यांमध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. आशिया कप विजेत्या श्रीलंका संघाचा नामिबियासारख्या कमकुवत संघाने मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यानंतर तगड्या खेळाडूंचा भरणा असलेल्या वेस्ट इंडिजचाही स्कॉटलँडने पराभव केला होता. त्यामुळे प्रत्येक सामना हा काट्याचा असणार हे नक्कीच. मात्र अशातच वर्ल्ड कपमधून एका संघाचं पॅकअप झालं असून तो संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. (T20 World Cup 2022 UAE team out of tournament latest marathi Sport news)

सुपर 12 साठी खेळल्या जात असलेल्या पात्रता फेरीमध्ये सलग दुसरा पराभव झाला आहे. हा संघ दुसरा तिसरा कोणी नसून UAE आहे. आज मंगळवारी श्रीलंका आणि यूएईमध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकेने मोठा विजय मिळवला आहे. या पराभवामुळे यूएईचा सुपर 12 मध्ये जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. 

पहिल्या सामन्यात नामिबियाविरुद्ध एकतर्फी पराभव पत्करावा लागलेल्या श्रीलंकेने शानदार पुनरागमन करत यूएईविरुद्ध 79 धावांनी विजय नोंदवला. श्रीलंकेला पहिल्या सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला होता पण दुसऱ्या सामन्यात त्यांनी यूएईवर मोठा पराभव मिळवत आशा जिवंत ठेवल्या. श्रीलंकेने 20 षटकांत 8 बाद 152 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यानंतर यूएईला 17.1 षटकांत 73 धावांत रोखले. 

सुपर-12 मध्ये कोणते संघ स्थान निर्माण करतात हे पाहणंं महत्त्वाचं ठरणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते वाट पाहत आहेत. 23 तारखेला सामना असून दोन्ही संघांची जोरदार तयारी सुरू आहे.