Suryakumar Yadav : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात टीम इंडियाने (Team India) पाच विकेट राखून विजय मिळवला. पण विजयाचं माफक आव्हान पार करताना भारताला पाच विकेट गमवावे लागले. युवा खेळाडूंना सुरुवातीला फलंदाजीला पाठवण्याच कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) प्रयोग सपशेल फसला. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सपशेल फ्लॉप ठरले. सूर्यकुमार यादव केवळ 19 धावा करुन बाद झाला. 32 वर्षीय सूर्यकुमार यादवला टीम इंडियात संधी मिळाली, पण या संधीचं तो सोनं करु शकलेला नाही. सूर्यकुमारने आतापर्यंत खेळलेल्या 24 एकदिवसीय सामन्यात 23.78 च्या अॅव्हरेजने केवळ 452 धावा केल्या आहेत. यात केवळ दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
श्रीलंकेविरुद्ध वन डे पदार्पण
सूर्यकुमार यादवने 18 जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबोत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या सामन्यात सूर्याने नाबाद 31 धावा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दुसऱ्याच सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या कामगिरीने भारतीय संघाला मधल्या फळीतील एक तगडा फलंदाज मिळाला असं वाट तोहं. पण 2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या 64 धावांच्या खेळीनंतर त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत नंबर चारवर मजबात दावा करण्याची संधी सूर्याकडे होती. पण गेल्या काही सामन्यात तो सातत्याने अपयशी ठरत आहे. वेगवान गोलंदाजांसमोर सूर्या अजूनही पूर्ण आत्मविश्वासाने खेळताना दिसत नाही.
सूर्यकुमार यादवचे शेवटचे 20 एकदिवसीय सामने
31* धावा vs श्रीलंका, कोलंबो (RPS)
53 धावा vs श्रीलंका, कोलंबो (RPS)
40 धावा vs श्रीलंका, कोलंबो (RPS)
39 धावा vs साउथ आफ्रीका, केपटाउन
34* धावा vs वेस्टइंडीज, अहमदाबाद
64 धावा vs वेस्टइंडीज, अहमदाबाद
6 धावा vs वेस्टइंडीज, अहमदाबाद
27 रन vs इंग्लंड, लॉर्ड्स
16 धावा vs इंग्लंड, मॅनचेस्टर
13 धावा vs वेस्टइंडीज, पोर्ट ऑफ स्पेन
9 धावा vs वेस्टइंडीज, पोर्ट ऑफ स्पेन
8 धावा VS वेस्टइंडीज, पोर्ट ऑफ स्पेन
4 धावा vs न्यूजीलंड, ऑकलॅंड
34* धावा vs न्यूजीलंड, हैमिल्टन
6 धावा vs न्यूजीलंड, क्राइस्टचर्च
4 धावा vs श्रीलंका, तिरुवनंतपुरम
31 धावा vs न्यूजीलंड, हैदराबाद
14 धावा vs न्यूजीलंड, इंदौर
0 धावा vs ऑस्ट्रेलिया, मुंबई
0 धावा vs ऑस्ट्रेलिया, विशाखापट्टनम
19 धावा vs वेस्टइंडिज, बारबाडोस
सूर्यकुमार का फ्लॉप होतोय?
क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये क्वचित खेळाडू यशस्वी ठरतात. कसोटी क्रिकेटमध्ये बचाव आणि तंत्रशुद्ध फलंदाजीची आवश्यकता असते. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये संयमी आणि आक्रमकपणा अशा दोन्ही गोष्टी लागतात. टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजाला मैदानावर स्थिर होण्याचा वेळ मिळत नाही. सूर्यकुमार यादवने 360 डिग्री स्किलचा वापर करत टी20 क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या. पण वन डे क्रिकेटमध्ये त्याची ही टेक्निक काम करताना दिसत नाहीए. कदाचित टी20 क्रिकेटचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्या एकदिवसीय सामन्यात जम बसवता येत नाहीए.
शिवाय सुर्यकुमार यादवचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजीचा क्रम सातत्याने बदलताना दिसतोय. गेल्या 24 एकदिवसीय सामन्यात सूर्या नंबर 3 वर एकवेा, नंबर 4 वर पाच वेळा तर नंबर पाच वेळा 11 वेळा आणि सहा नंबरवर तीन वेळा फलंदाजी करता मैदानात उतला आहे.
टी20 मध्ये दमदार कामगिरी
एकदिवसीय सामन्याच्या उलट टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमारची बॅट जबरदस्त तळपली आहे. आयसीसी टी20 क्रमवारीतही तो अव्वल स्थानावर आहे. सूर्यकुमार यादवने 31 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तब्बल 1164 धावा केल्या आहेत. यात 2 शतकांचा समावेश आहे, तर नऊ अर्धशतकं लगावली आहे. एका कॅलेंडर टी20 क्रिकेटमध्ये एक हजार धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरलाय.
सूर्यकुमार यादवची टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्द
• 48 सामने, 1675 धावा, 46.52 अॅव्हरेज
• 3 शतकं, 13 अर्धशतकं, 175.76 अॅव्हरेज
• 150 चौके, 96 छक्के
सूर्यकुमारची वनडे आंतरराष्ट्रीय कारकिर्द
• 22 सामने, 433 धावा, 25. 47 अॅव्हरेज
• 2 अर्धशतकं, 102.36 अॅव्हरेज
• 45 चौके, 8 छक्के
सूर्यकुमार यादवची कसोटी कारकिर्द
• 1 सामना, 8 रन, 8.00 अॅव्हरेज