व्हिडिओ : जेव्हा चिमुरडा विचारतो, पप्पा 'मास्टरबेशन' म्हणजे काय?

जेव्हा एखादा छोटा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारतात... तेव्हा तुमचेही चेहरे पाहण्यासारखे असतात ना? त्यातही हे प्रश्न 'सेक्स' संदर्भात असतील तर 'हाय SSS तौबा...'

Updated: Jul 21, 2016, 06:43 PM IST
व्हिडिओ : जेव्हा चिमुरडा विचारतो, पप्पा 'मास्टरबेशन' म्हणजे काय? title=

मुंबई : जेव्हा एखादा छोटा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारतात... तेव्हा तुमचेही चेहरे पाहण्यासारखे असतात ना? त्यातही हे प्रश्न 'सेक्स' संदर्भात असतील तर 'हाय SSS तौबा...'

असाच आपल्या वडिलांना अडचणीत आणणारा अनेक प्रश्न विचारताना एक चिमुरडा दिसणार आहे 'सेक्स चाट विथ पप्पू अॅन्ड पापा' या वेब सीरिजमधून... 

यशराज फिल्म्सच्या या नव्या वेब सीरिजमध्ये अभिनेता सचिन पिळगावकर हादेखील एका बापाच्या भूमिकेत दिसतोय.

या वेब सीरिजची सुरुवात नुकतीच झालीय... आणि त्याचा पहिला भाग अनेकांना आवडलायदेखील... यात चिमुरडा पप्पू 'मास्टरबेशन'चा अर्थ त्याच्या पप्पांकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय... त्याच्या या जिज्ञासू प्रश्नाचं उत्तर त्याच्या पप्पांनी कसं दिलंय तेही पाहाच...