न्यूयॉर्क : फेसबूकने इमिझीला अधिक प्राधान्य दिल्यानंतर आता डेस्कटॉपवर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबूकचे लाईव्ह फीचर डेस्कटॉपवर वापरता येणार आहे. याआधी व्हाट्सअॅप डेस्कटॉपवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
सध्या मोबाईलवर उपलब्ध असलेले फेसबूक लाईव्ह हे फीचर डेस्कटॉपवर उपलब्ध करण्याचा निर्णय फेसबूकने घेतलाय. फेसबूक लाईव्ह या फीचरद्वारे अनेक सेलिब्रेटी, सर्वसामान्य याचा वापर करत आहेत. याची वाढती लोकप्रियता पाहता हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
मोबाईलवर अनेक अडचणी येतात. त्यामुळे डेस्कटॉपमुळे कमी होतील, असे म्हटले जात आहे. तसेच फेसबूक पेज असलेल्यांना या सुविधेचा विशेष लाभ होणार आहे. तसेच यामुळे लाईव्हमधील सुरक्षितता आणि गुणवत्ता दोन्हीही वाढणार असल्याचे फेसबूकने म्हटलंय.