www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोशल मीडियाच्या वापराचे महत्व राजकारण्यांनी लक्षात घेतले पाहिजे, या माध्यमाचा वापर मनं आणि माणसं जोडण्यासाठी व्हायला हवा, दुर्देवाने हा वापर बुद्धीभेद करण्यासाठी होत असल्याचं मत, या क्षेत्रातील तज्ज्ञ रवी घाटे यांनी व्यक्त केले आहे.
तर निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माध्यमात सक्रीय रहावे, असं आवाहन नितीन वैद्य यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोशल मीडिया या विषयावर नगरसेवक आणि पदाधिकाऱयांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी घाटे बोलत होते.
यावेळी महापौर चंचला कोद्रे, शहराध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रवी चौधरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया या विषयातील सल्लागार नितीन वैद्य आणि मिलिंद क्षीरसागर यांची या उपस्थिती होती.
एकाच वेळी हजारो जणांना एसएमएस कसे पाठवता येतील, फेसबुकवर जास्तच जास्त लोकांना कसं जोडून घेता येईल?, यावर यावेळी घाटे यांनी मार्गदर्शन केले.
प्रत्यक्ष संपर्क नव्वद टक्के आणि सोशल मीडिया दहा टक्के असे प्रमाण आहे.
प्रचलित माध्यमांबरोबरच सोशल मीडियाही महत्वाचा आहे. राज्यातील दोन कोटी लोक या सोशल मीडियाचा वापर करतात.
आगामी निवडणुकांच्या काळात विचारांचे युद्ध सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लढले जाणार आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी या माध्यमात सक्रिय राहून पुढाकार घ्यावा, असे आवाहन नितिन वैद्य यांनी केले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.