www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या आयआयटीमध्ये टेकफेस्ट या महोत्सवाची सध्या चांगलीच धूम सुरू आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या महोत्सवाटा आजचा अखेरचा दिवस आहे. पहिल्याच दिवशी या महोत्सवाला ३५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गर्दी केली. यावरून रोबोचे अद्यापही विद्यार्थ्यांना किती आकर्षण याची प्रचिती आली.
सुसाट वेगानं धावणारी एफ-१ गाडीपासून ते विविध प्रकारचे रोबो आणि तज्ज्ञांची व्याख्यानं यांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला. आयआयटीच्या कॅम्पसमध्ये हा सर्व गोतावळा जमा झाला आणि हे कॅम्पस विविध प्रकारच्या तांत्रिक बाबींनी अगदी गजबजून गेलं.
या दरम्यान, सभागृहांमध्ये राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळींवरील तज्ज्ञांची व्याख्यानं विद्यार्थ्यांनी मन लावून ऐकली. आपल्या कल्पनांना तंत्रज्ञानाची जोड देऊन विद्यार्थ्यांनी साकारलेले अफलातून रोबो या ठिकाणी येणाऱ्याच विद्यार्थी-पालकांच्या डोळ्यात वेगळीच चमक आणत होते.
या महोत्सवात क्लाऊट कॉम्प्युटिंग आणि हॅकट्रिक्स यांसारख्या कार्यशाळांचंही आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या दिवशीसारखीच धूम दुसऱ्या दिवशीही होती. निश्चित रविवार हा या महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये एकप्रकारची हुरहूर कायम होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.