धोनी आणि दीपिका कुमारीची मतदानाला दांडी

जास्तच जास्त लोकांनी मतदान करावं, या हेतूने निवडणूक आयोगाने ज्या सेलिब्रिटींना ब्रॅण्ड एंबेसडर बनवलं होतं, त्यातील काही सेलिब्रिटींनी मतदानाला दांडी मारली आहे.

Updated: Dec 9, 2014, 02:26 PM IST
धोनी आणि दीपिका कुमारीची मतदानाला दांडी title=

नवी दिल्ली : जास्तच जास्त लोकांनी मतदान करावं, या हेतूने निवडणूक आयोगाने ज्या सेलिब्रिटींना ब्रॅण्ड एंबेसडर बनवलं होतं, त्यातील काही सेलिब्रिटींनी मतदानाला दांडी मारली आहे.

झारखंडमध्ये आज विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे, मात्र आज टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि तीरंदाज दीपिका कुमारी मतदान करणार नाहीय, हे दोन्ही खेळाडू निवडणूक आयोगाचे ब्रँड एंबेसडर आहेत.

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, आजपासून टीम इंडिया पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात करणार आहे. मात्र धोनी फिट नसल्याने आजचा सामना खेळणार नाहीय.

तिरंदाज दीपिका कुमारी बंगलुरूमध्ये सुरू असलेल्या एक ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी झाली आहे, त्यामुळे ती मतदान करत नाहीय. महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षीने मतदानाचा हक्क बजावला आहे, हे केंद्र महेंद्र सिंह धोनीची लहानपणीच्या शाळेत होतं, त्यावर साक्षीने आपण पहिल्यांदा धोनीची प्राथमिक शाळा पाहिली असल्याचं म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.