मुंबई : चिक्की खरेदीत २०६ कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपानंतर आज भारतात परतलेल्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या घोटाळ्यावर मीडियासमोर स्पष्टीकरण दिलंय.
मुख्यमंत्र्यांनी दर करासासाठीही ईटेंडरिंग करण्याचे आदेश एप्रिलमध्ये दिलेत, माझ्या खात्यातील खरेदी ही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झाली आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्यावरचे आरोप धुडकावून लावलेत. शिवाय, काँग्रेस सरकारच्या काळात निश्चित झालेल्या दरानुसारच ही खरेदी झाली, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
पाहुयात त्या काय काय म्हणाल्यात....
उल्लेखनीय बाब म्हणजे पंकजा मुंडेंवरील आरोपांबाबत त्या खुलासा करत असताना, भाजपचा अन्य कुणीही मंत्री त्यांच्यासोबत नव्हता... शिक्षणमंत्री विनोद तावडेंवरील आरोपांचं खंडन करण्यासाठी मंगळवारी तीन-तीन मंत्री मीडियाला सामोरे गेले. आज पंकजा मुंडेंना मात्र एकाकी खिंड लढवावी लागली. त्यामुळं त्या भाजपमध्ये एकाकी पडल्याचं बोललं जातंय... दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यक्रम आधीच ठरले असल्यानं आपणच त्यांना येऊ नका असं सांगितलं. तर मुख्यमंत्री परदेशात आहेत, अशी सारवासारव स्वतः पंकजा मुंडेंनीच केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.