जेवल्यानंतर त्याच ताटात हात का धुऊ नयेत?

Does Washing Hands in Plate Good : जेवण झाल्यानंतर ताटात हात धुवायेच की नाही? न धुण्याची कारण काय? 

दिक्षा पाटील | Updated: Jan 2, 2025, 06:19 PM IST
जेवल्यानंतर त्याच ताटात हात का धुऊ नयेत? title=
(Photo Credit : Social Media)

Does Washing Hands in Plate Good : अनेकांना आपण जेवल्यानंतर ताटात हात धुण्याची सवय असते. पण त्यावरून अनेकदा घरातील मोठे असं करु नका असं सांगताना दिसतात. त्याचं कारण म्हणजे हिंदू धर्मात अन्न हे पूर्णब्रह्म अर्थात अन्न हे सगळंकाही आहे असं म्हणतात. अन्नपूर्णा देवीची आपण पूजा करतो. इतकंच नाही तर घरातील मोठे अनेकदा अन्नाचा अपमान करु नका असं सांगतात. तर त्याशिवाय ताटात काही उरवू नका हे देखील सांगताना दिसतात. अशात जर तुम्ही ताटात हात धूत असाल तर आपल्या परंपरेत त्याविषयी काय बोलतात ते जाणून घेऊया. 

तुम्हाला माहित नसेल तर अनेक ठिकाणी ज्या ताटात जेवलो त्या ताटात हात धुवून तेच पाणी पिण्याची पद्धत असते. हे अशामुळे की अन्नाचा एकही दाना हा वाया जाऊ नये आणि अन्नाचा अपमान होऊ नये यासाठी असं करतात. ज्या ताटात आपण जेवतो त्याच ताटात हात कधीच धुवू नये. वास्तुशास्त्रानुसार, असं केल्यानं देवी अन्नपूर्णा कोपते असं म्हणतात. यामुळेच देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात वास करत नाही असं म्हणतात. जेवल्यानंतर ताटात हात धुतल्यानं नकारात्म उर्जा घर करुन राहते. त्यामुळे अनावश्यक गोष्टींमध्ये खर्च होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही अनेक समस्यांना सामोरे जाऊ शकता. 

दरम्यान, संपूर्ण देशात याविषयी वेगवेगळ्या चर्चा आहेत. दक्षिणेत काही ठिकाणी ताटात हान न धुणे म्हणजे चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आपण देवाचा अपमान करतो असं म्हणतात. आता देशात वेगवेगळ्या परंपरा असल्या तरी त्यांच्या भावना त्याच आहेत की देवाचा अपमान झाला नाही पाहिजे. 

जेवणाची योग्य पद्धत

खाली आसनावर मांडी घालून जेवायला बसावं. कधी सोफ्यावर किंवा पलंगावर बसून जेवू नये. वास्तुशास्त्रानुसार, आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी जेवायला बसू नये. त्यानं तुम्ही आजाराला निमंत्रन देतात असं म्हटलं जातं. जितकं गरजेचं आहे तितकंच जेवण ताटात वाढून घ्यायला हवं. तर असं म्हणतात जर तुमच्या ताटात अन्न उरलं असेल तर प्राण्यांना खाऊ घालावं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)