15K Investment in SIP : गुंतवणूक करण्यासाठी SIP ही सगळ्यात चांगली पद्धत आहे. तुम्ही छोट्यात-छोटी रक्कम गुंतवत असला तरी सुद्धा त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. तर तुम्ही लवकरात लवकर आणि दरमहिन्याला न चुकता गुंतवणूक करणं फायदेशीर ठरू शकतं. कोणती गोष्ट करण्यासाठी आणि त्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी मदत होते. दरम्यान, जर तुम्ही मासिक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये 15,000 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर तुम्ही रिटायर होईपर्यंत तुमच्याकडे 7 कोटी राहतील. आता ते कसं हे आपण जाणून घेऊया.
Systematic Investment Plan (SIP) म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा एक गुंतवणूक करण्याचा प्रकार आहे. या पद्धतीनं तुम्ही म्युच्यूअल फंड्समध्ये गुंतवणूक करू शकतात. यात अनेक लोक दिवसाला, आठवड्याला, महिन्याला, तीन महिन्यात, सहा महिन्यात किंवा वर्षाला एक ठरावीक रक्कमेची गुंतवणूक करतात. महत्त्वाचं म्हणजे SIP मध्ये गुंतवणूक कोणीही करू शकतं. याची सुरुवात ही 100 रुपयांपासून होते. त्याशिवाय ही रक्कम ऑटोमॅटीक पद्धतीनं तुमच्या खात्यातून पैसा आपोआप कट होतात. त्यामुळे कधी तुम्ही ही गुंतवणूक करायचं विसराल याची भीती राहत नाही. गुंतवणूक करण्याची ज्यांनी सुरुवात केली आहे. त्यांच्यासाठी SIP हा सगळ्यात योग्य पर्याय आहे. जे पहिल्यांदा गुंतवणूक करत आहेत ते छोट्या रक्कमेपासून हे सुरु करु शकाल.
जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी दर महिन्याला 5 हजार रुपयांची गुंतवणूक करायला सुरुवात करत असाल तर वयाच्या 45 वर्षापर्यंत म्हणजेच 20 वर्षात एकूण 12,00,000 रुपयांची गुंतवणूक कराल. जर यातही त्याला 12 टक्के रिटर्न्स मिळाले तर एकूण मिळणारी रक्कम ही 50,00,000 होते.
जर तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षी दर महिन्याला 5 हजार रुपयांची गुंतवणूक करायला सुरुवात कराल तर वयाच्या 55 व्या वर्षी अर्थात 20 वर्षा पर्यंत वरच्याप्रमाणेच तुम्ही 12,00,000 ची गुंतवणूक कराल आणि तुम्हाला 12 टक्के रिटर्न्स 28,00,000 रुपये मिळतील. जर तुम्ही हे फक्त 10 वर्षांसाठी सुरु कराल म्हणजे वयाच्या 25 वर्षी सुरु केलं तर तुम्हाला 22,00,000 रुपये मिळतील.
जर तुमचं टार्गेट हे 7 कोटी असेल तर त्यासाठी तुम्ही दर महिन्याला 15000 रुपयांची गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तेव्हा 12 पर्सेंट रिटर्नवर तुम्हाला 7 कोटी मिळतील. यासाठी लागणारा काळ जो आहे तो तब्बल 33 वर्ष आहे.
(Disclaimer : तुम्ही अशाप्रकार कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास जबाबदार राहणार नाही.)