पंकज भुजबळांचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे

बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज पंकज भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयातून मागे घेतलाय. 

Updated: Nov 29, 2016, 10:48 PM IST
पंकज भुजबळांचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे  title=

मुंबई : बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज पंकज भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयातून मागे घेतलाय. 

पुन्हा नव्याने अटकपूर्व जामीन अर्ज करणार असल्याने त्यांनी आधी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतलाय.

पण, या दरम्यान पंकज भुजबळ यांना अटक करु नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. 

त्यामुळे आता पंकज भुजबळ हे पीएमएलए कलम ८८ नुसार मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात नवीन अटकपूर्व जामीन अर्ज करणार आहेत.