नवाब मलिक यांच्या सभेत गोळीबार, संजय दिना पाटीलांवर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या चेंबूरच्या सभेत ७-८ अज्ञात बंदुकधारी घुसून गोळीबार  घटना घडली आहे. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसून या हल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय दिना पाटील हेच जबाबदार असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. 

Updated: Nov 29, 2016, 11:41 PM IST
नवाब मलिक यांच्या सभेत गोळीबार, संजय दिना पाटीलांवर आरोप  title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या चेंबूरच्या सभेत ७-८ अज्ञात बंदुकधारी घुसून गोळीबार  घटना घडली आहे. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसून या हल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय दिना पाटील हेच जबाबदार असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. 

गोळी बार झाल्यानंतर धावपळ झाली. त्यावेळी नवाब मलिक यांच्या कार्यकर्त्यांनी एका तलवारधाऱ्याला पकडले आहे. तलवारधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात नवाब मलिक यांचे ८- ते १० कार्यकर्ते जखमी झाल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. 

सध्या नवाब मलिक आणि संजय दिना पाटील पोलिस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे. 

आपल्या पक्षातील माजी खासदारांवर नवाब मलिक यांनी आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केल्यानंतरच पक्ष श्रेष्ठींना माहिती देणार असल्याचे नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.