मुंबई : लक्ष्मी ही युवती आता व्हिवा आणि दिवा या फॅशन जगतातील नामांकित ब्रँन्डसची अॅम्बेसेडर झाली आहे. फेस ऑफ करेज या शिर्षकाखाली लक्ष्मीला ब्रँन्ड अॅम्बेसेडर केले गेले आहे.
काळ सर्व गोष्टीवरील औषध आहे. अॅसिड हल्ल्यात आपला चेहरा हरवून बसलेली लक्ष्मी आता अॅम्बेसेडर बनली आहे.
या मोहिमेद्वारे लोकांचा फॅशनकडे बदलण्याचा दृष्टीकोन बदलेल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
लक्ष्मी ही अॅसिड हल्ला पिडीतांसाठी नव्हे तर सर्व महिलांसाठीच एक आदर्श असल्याचे आणि समाजातील विघातक प्रवृत्तीविरोधात लढणाऱ्या प्रत्येकासाठीच हा फ्लॅटफॉर्म असल्याचे यावेळी सांगण्यात आले.