मुंबई बँकेला हायकोर्टानं दिला दणका; 'झी मीडिया'च्या बाजूनं कौल

पुन्हा एकदा सच्चा पत्रकारितेचा विजय झालाय, असं म्हणता येणार आहे. हायकोर्टानं वादग्रस्त 'मुंबै बँकेच्या' कारभाराला चांगलाच दणका दिलाय.

Updated: Jan 29, 2015, 07:22 PM IST
मुंबई बँकेला हायकोर्टानं दिला दणका; 'झी मीडिया'च्या बाजूनं कौल title=

मुंबई : पुन्हा एकदा सच्चा पत्रकारितेचा विजय झालाय, असं म्हणता येणार आहे. हायकोर्टानं वादग्रस्त 'मुंबै बँकेच्या' कारभाराला चांगलाच दणका दिलाय.

'झी २४ तास'नं मुंबै बँकेत सुरू असलेला 'गोलमाल' जनतेसमोर आणला. त्यामुळं धाबे दणाणलेल्या मुंबै बँकेनं हायकोर्टात धाव घेतली... तेव्हा मुंबै बँकेसंदर्भातल्या बातम्या दाखवण्यास हायकोर्टानं स्थगिती दिली होती. 

मात्र, आज 'झी मीडिया'ची बाजू ऐकून घेतल्यानंतर हायकोर्टानं हा स्टे उठवला आहे. हायकोर्टाचा स्टे आल्यामुळं आम्ही मुंबै बँकेसंदर्भातील बातम्या काही दिवस दाखवू शकलो नव्हतो. परंतु, मुंबई भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याचा वेगळा अर्थ काढला. एव्हढंच नव्हे, तर 'झी २४ तास'च्या विरोधात बदमानीकारक कॅम्पेन राबवलं होतं. 

हायकोर्टानं आता 'झी २४ तास'च्या बाजूनं कौल दिल्यानं अशी कॅम्पेन राबवणाऱ्या लोकांचं पितळं उघडं पडलंय. यापुढंही मुंबै बँकेतला गैरव्यवहार आणि त्यासंदर्भातील कारवाईच्या बातम्या आम्ही दाखवतच राहणार आहोत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.