धक्कादायक! तुम्ही पित असलेल्या ज्यूसमधील बर्फ दूषित

उन्हाचा कडाका जसजसा वाढतोय तसतसा ज्यूस सेंटर्सवर मोठी गर्दी पाहायला मिळते. ज्यूससोबत जास्त बर्फाची विशेष मागणी नागरिकांकडून करण्यात येते. मात्र हाच बर्फ किंवा बर्फाचा गोळा जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे.

Updated: Apr 30, 2017, 07:31 PM IST
धक्कादायक! तुम्ही पित असलेल्या ज्यूसमधील बर्फ दूषित title=

मुंबई : उन्हाचा कडाका जसजसा वाढतोय तसतसा ज्यूस सेंटर्सवर मोठी गर्दी पाहायला मिळते. ज्यूससोबत जास्त बर्फाची विशेष मागणी नागरिकांकडून करण्यात येते. मात्र हाच बर्फ किंवा बर्फाचा गोळा जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेनं बर्फाची तपासणी केली. यांतील ९६ टक्के नमुने दूषित आढळलेत. १४ प्रभागातील १०० टक्के नमुने दूषित होते. 75 टक्के बर्फात ई कोलाय हा विषाणू आढळलाय. हा विषाणू आरोग्याला धोकादायक आहे.