...जेव्हा चप्पल न घालताच दाखल झाले आमदार महोदय!

विधानभवनाच्या आवारात आमदार तुकाराम काते आज चप्पल न घालताच आलेले दिसले. 

Updated: Dec 14, 2016, 09:19 AM IST
...जेव्हा चप्पल न घालताच दाखल झाले आमदार महोदय! title=

नागपूर : विधानभवनाच्या आवारात आमदार तुकाराम काते आज चप्पल न घालताच आलेले दिसले. 

मुंबईच्या अणुशक्तीनगर विधानसभा मतदार संघातून शिवसेने कडून ते विजयी झालेत. अणुशक्ती नगर भागात दाट लोकवस्ती आहे. मात्र येथील नागरिकांना पाण्यासाठी तीन डोंगर उतरून पाणी घ्यावे लागते. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी टाक्या बांधून पाणी वर चढवण्यात यावे, अशी योजना आहे. मात्र मुंबई महानगर पालिका या योजनेत आडमुठी भूमिका घेत असल्याचा कातेंचा आरोप आहे.

शिवसेनेचे आमदार असले तरी हे आंदोलन मुंबई महानगर पालिकेविरुद्ध असल्याचं काते सांगतात. निधी मिळूनही पाणीपुरवठा योजना न सुरु झाल्याने अनवाणी फिरुन कातेंनी याचा निषेध केलाय. 

जोपर्यंत नागरिकांना पाणी मिळणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा निश्चय आमदार तुकाराम काते यांनी केलाय. काते यांच्या या अनोख्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आता काय भूमिका घेते? यावर काते याचं लक्ष लागले आहे.