नागपूर : पुण्यातल्या भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी घुमजाव केले आहे. चौकशीदरम्यान खडसे यांनी घुमजाव केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा खडसे येण्याची शक्यता आहे.
नागपुरात झोटिंग समितीसमोर काही वेळापूर्वी एकनाथ खडसे हजर झाले. आधी जमीन एमआयडीसीची नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. पण आता घुमजाव केले आहे. एमआयडीसीचे वकील चंद्रशेखर जलतारे यांनी ही माहिती दिली.
भोसरीमधल्या जमीन गैरव्यवहाराचे खडसेंवर आरोप आहेत. झोटिंग समिती या प्रकरणाचा तपास करत आहे. याप्रकरणी उत्तर देण्यासाठी खडसे त्यांच्या वकिलांसह झोटिंग समितीसमोर उपस्थित आहेत. सुमारे दोन तास ही चौकशी सुरू राहण्याची शक्यता आहे.