राज्यात या ठिकाणी रात्री 10.30 पर्यंत मतदान

राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसाठी विक्रमी 67% मतदान झाले.. प्रभाग क्रमांक 11 च्या कृष्णानगर मधल्या एका मतदान केंद्रावर तर रात्री 10.30 पर्यंत मतदान सुरु होते! 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 22, 2017, 12:11 PM IST
राज्यात या ठिकाणी रात्री 10.30 पर्यंत मतदान   title=

पुणे : राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसाठी विक्रमी 67% मतदान झाले.. प्रभाग क्रमांक 11 च्या कृष्णानगर मधल्या एका मतदान केंद्रावर तर रात्री 10.30 पर्यंत मतदान सुरु होते! 

सकाळी ७.३० वाजता सुरू झालेल्या मतदानाची वेळ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होती. मात्र उशिरा बाहेर पडलेल्या मतदारांमुळे साडेपाच पर्यंत केंद्राबाहेर मोठ्या संख्येने रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सव्वा सातपर्यंत प्रभाग २१ मध्ये मतदान प्रक्रिया सुरू होती.