'चड्डी-बनियान गँग'चा धुमाकूळ कॅमेऱ्यात कैद

कल्याणमध्ये चड्डी बनियन गँगने धुमाकूळ घातलाय. चड्डी बनिन गँगने एकाच वेळी तीन घरं फोडली आहेत.

Updated: Jan 8, 2016, 10:54 AM IST

कल्याण : कल्याणमध्ये चड्डी बनियन गँगने धुमाकूळ घातलाय. चड्डी बनिन गँगने एकाच वेळी तीन घरं फोडली आहेत.

दरोडेखोरांना रोखण्यासाठी गेलेल्या वॉचमनवरही त्यांनी हल्ला केला. गँगच्या हल्ल्यात वॉचमन गंभीर जखमी झालाय. जखमी वॉचमनचं नाव इमामुद्दीन असं आहे.

कल्याण पश्चिमेला सर्वोदय या हाय प्रोफाईल इमारतीत हा थरार घडला. आठ ते दहा जण या इमारतीत घुसले होते. तीन घरात त्यांनी चोरी केली. 

मात्र, हे दरोडेखोर परतत असताना वॉचमनने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर वॉचमनला त्यांनी दगडाने मारलं. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.