मुंबई : बॉलिवूड स्टार ऋतिक रोशननं आपला ४२ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. परंतु, या पार्टीमध्ये सुझान मात्र अनुपस्थित राहिली.
ऋतिकच्या पार्टीत त्याचे अनेक मित्र आणि नातेवाईक सहभागी झाले होते. सुझानशी घटस्फोट झाल्यानंतरही ऋतिकचे सुझानच्या कुटुंबीयांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे, या पार्टीत सुझानही सहभागी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, सुझान या पार्टीत कुठेही दिसली नाही.
याच विषयावर सुझाननं खुलासा केलाय. या पार्टीत ती नव्हती कारण तिला यासाठी आमंत्रणच देण्यात आलं नव्हतं.
'आमच्या मुलांमुळे ऋतिक आणि माझे संबंध खूप चांगले आहेत. आम्ही चांगले आई-वडील आहोत आणि ही आमची प्राथमिकता आहेत. परंतु, हे आम्हाला सार्वजनिक बनवू इच्छित नाही... त्यामुळेच आम्ही कधी एकत्रही फिरत नाहीत. मला आमंत्रण न देण्याचं कारण मी समजू शकते. खरं म्हणजे आम्ही एकमेकांच्या वाढदिवसाला एकमेकांना आमंत्रण देत नाही. लोकांना विनाकारण छोट्या गोष्टींची चर्चा करायला मजा येते' असं सुझाननं यावेळी म्हटलंय.
देवाच्या कृपेनं आम्हाला एकमेकांकडून शांती लाभलीय. मी ऋतिकसाठी नेहमीच प्रार्थना करेन की तो जे काही करेन त्यात त्याला आनंद मिळो आमि मला माहीत आहे की तोही माझ्यासाठी हीच प्रार्थना करेन, असं सांगायला सुझान विसरली नाही.