मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या होणार सून मी या घरची ही मालिका अखेर आपला गाशा गुंडाळते आहे. या मालिकेतील श्री आणि जान्हवी या पात्रांनी अल्पावधीतच रसिकांना आपलंसं केलं.
गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा होती. तसेच जान्हवीला बाळ कधी होणार असा गहन प्रश्नही चाहत्यांना पडला होता.
अखेर या सगळ्या प्रश्नांवरुन पडदा उठला आहे. जान्हवीला मुलगी झाली असून या बाळाचं बारसं करुन या मालिकेचा शेवट करण्यात येणार आहे..नुकतचं या भागाचं शूट पार पडलं असून या महिन्या अखेरीस ही मालिका बंद होणार आहे.