...जेव्हा शिल्पानं धरले जॅकी चैनचे पाय!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आंतरराष्ट्रीय अॅक्शन स्टार जॅकी चैनची मोठी फॅन आहे... स्टेजवर जेव्हा तिनं जॅकीचे पाय धरले तेव्हा हे दिसून आलं. 

Updated: Jan 25, 2017, 01:17 PM IST
...जेव्हा शिल्पानं धरले जॅकी चैनचे पाय! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आंतरराष्ट्रीय अॅक्शन स्टार जॅकी चैनची मोठी फॅन आहे... स्टेजवर जेव्हा तिनं जॅकीचे पाय धरले तेव्हा हे दिसून आलं. 

मंगळवारी रात्री 41 वर्षीय शिल्पा कुंग फू योग प्रचार कार्यक्रमासाठी उपस्थित होती. 'इथं मी अभिनेत्री किंवा योग उत्साही म्हणून नाही तर जॅकी चैन यांची फॅन म्हणून आलेय' असं शिल्पानं म्हटलं. 

इतकंच नाही तर जॅकी चैन मुळेच मी अभिनेत्री बनले, असंही शिल्पानं म्हटलं. जॅकीला सोडून शिल्पा आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्यासाठी वेडी झालेली नाही, हेही तिनंच स्पष्ट केलं. जॅकीमुळेच आपण कराटे शिकल्याचंही तिनं सांगितलं.