आज बॉक्स ऑफिसवर रईस आणि काबिलची टक्कर

वर्षाच्या सुरुवातीलाचं बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका झालाये..कारण ह्या वर्षातील दोन मच अवेटेड सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत.

Updated: Jan 25, 2017, 09:39 AM IST
आज बॉक्स ऑफिसवर रईस आणि काबिलची टक्कर title=

मुंबई : वर्षाच्या सुरुवातीलाचं बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका झालाये..कारण ह्या वर्षातील दोन मच अवेटेड सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत.

किंग खानचा रईस आणि हृतिक रोशन स्टारर काबिल हे दोन्ही सिनेमे  प्रदर्शित झाले आहेत..तबब्ल 92 कोटींचं बजेट असलेला 'रईस' हा तद्दन मसाला पट आहे. तब्बल 2500 स्क्रिन्सवर रईस प्रदर्शित झाला असून 55 टक्के ओपनिंग रईसला मिळालं आहे.

तर काबीलचा विषय वेगळा असून हृतिक रोशनचा अजुन एक दमदार परफॉर्मन्स काबीलमध्ये बघायला मिळतोयं. 55 कोटींचं बजेट असलेला काबील 2350 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला असून 45 टक्के ओपनिंग काबीलला मिळालं आहे.

दोन्ही सिनेमाचं बजेट जास्त असल्यामुळे दोन्ही सिनेमांची कमाई विभागली जाणार असं एकंदरित चित्र बघायला मिळतये. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसचा रईस कोण ठरतं हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.