लहानपणापासूनच मुलींना डेट करतोय - रणबीर

अफेअर्सच्या बातम्यांमुळं नेहमी चर्चेत असलेला बॉलिवूडचा चॉकलेटी बॉय रणबीर कपूर नेहमी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलणं टाळतो. मात्र एका इंटरव्ह्यू दरम्यान त्यानं याचं कारण सांगितलंय. 

Updated: Aug 25, 2014, 07:42 AM IST
लहानपणापासूनच मुलींना डेट करतोय - रणबीर title=

मुंबई: अफेअर्सच्या बातम्यांमुळं नेहमी चर्चेत असलेला बॉलिवूडचा चॉकलेटी बॉय रणबीर कपूर नेहमी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलणं टाळतो. मात्र एका इंटरव्ह्यू दरम्यान त्यानं याचं कारण सांगितलंय. 

रणबीर कतरीनासोबतच्या आपल्या नात्याचा जाहीरपणे स्वीकार का करत नाही? हे विचारलं असता रणबीर म्हणाला, “या प्रश्नाची त्याला खूप भीती वाटते. कारण त्यावरून अनेक अर्थ लावले जातात. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि योग्यवेळ असेल तेव्हा मी लग्न करीन.” त्यापूर्वी आपल्या नात्याबद्दल काही बोलण्यास रणबीरनं नकार दिला. 

रणबीर म्हणाला, तो एक अभिनेता आहे आणि त्याच्या कामाबद्दल त्याला प्रश्न विचारायला हवेत. यावेळी बोलतांना रणबीरनं सांगितलं की, तो शाळेत असतांना अनेक मुलींना डेट करायचा आणि त्याच्या कुटुंबियांना हे माहित आहे. यात काही गैर नाही की ते लपवावं, असंही रणबीरनं सांगितलं.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.