Saif Ali Khan Attack News: बॉलिवूडचा छोटा नवाब सैफ अली खान एक मोठ्या हल्ल्यातुन सुखरुप बचावला आहे. 16 जानेवारी रोजी वांद्रे येथील घरात सैफवर चाकू हल्ला झाला होता. सैफ अली खान हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला आहे. हल्ल्यात एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सैफसह आरोपीचे कपडे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
16 जानेवारी रोजी रात्री अडीच वाजता सैफवर चाकू हल्ला झाला. त्याच्या वांद्रे येथील घरात घुसून आोरपीने त्याच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात सैफ याला गंभीर दुखापत झाली. सैफच्या हाताला आणि मानेला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्यांच्या मानेत अडकलेला चाकूही बाहेर काढला.
शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद असे सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मोहम्मद शरिफूल बांगलादेशातील कुस्तीपटू आहे. त्याने अनेक कुस्तीच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाला होता. कुस्तीपटून असल्यानं सैफवर सहज केला हल्ला. कुस्तीच्या डावपेचानं केला सैफवर चाकू हल्ला केला. हल्ल्यापूर्वी आरोपीनं वांद्रे परिसराची रेकी केली होती. चोरीच्या उद्देशानं सैफच्या घरात घुसखोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सैफ अली खान हल्ला प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे.
हल्ल्यानंतर पोलिसांनी सैफ अली खान आणि त्याच्या कर्मचाऱ्यांचे रक्ताचे नमुने आणि कपडे गोळा केले आहेत. हे कपडे फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत.
शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ विजय दास असे 19 जानेवारी रोजी शेजारच्या ठाणे शहरातून हल्ल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. शुक्रवारी न्यायालयाने शरीफुलच्या पोलीस कोठडीत 29 जानेवारीपर्यंत वाढ केली. आरोपी तपास पथकाला सहकार्य करत नाही आणि त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकू कोठून खरेदी केला हे अद्याप सांगितलेले नाही. आरोपीच्या कपड्यांवरील रक्त खानचे आहे की नाही हे तपासण्यासाठी अभिनेते आणि आरोपींचे रक्ताचे नमुने आणि कपडे एफएसएलकडे पाठवण्यात आले आहेत. खान यांच्या अपार्टमेंटमधून गोळा केलेले फिंगरप्रिंट आरोपींच्या बोटांचे ठसे जुळत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान सैफ अली खानने मुंबई पोलिसांसमोर जबाब नोंदवला आहे. आरोपीने तिच्या घरातील मदतनीसवर हल्ला केला आणि तिच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोराने अचानक त्यांच्यावर अनेक वार करून पळ काढला असा जबाब सैफने नोंदवला आहे.