कुठे तयार केला जातो देशाचा तिरंगा? केवळ एका कंपनीकडे आहे याचे कॉन्ट्रॅक्ट

 देशभरात 76 व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकवला जातो. कुठे आणि कसा तयार केला जातो तिरंगा जाणून घेऊया. 

वनिता कांबळे | Updated: Jan 25, 2025, 11:50 PM IST
कुठे तयार केला जातो देशाचा तिरंगा? केवळ एका कंपनीकडे आहे याचे कॉन्ट्रॅक्ट title=

Republic Day 2025 : देशभरात 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पहायला मिळत आहे.  देशात आणि जगभरात अनेक ठिकाणी अभिमानाने तिरंगा फडकवला जातो. तुम्हाला माहीत आहे का कुठे तयार केला जातो देशाचा तिरंगा? एकाच कंपनीकडे तिरंग बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट आहे. जाणून घेऊया कुठे तयार केला जातो हा तिरंगा.

बळी येथे तिरंगा ध्वज बनवला जातो. कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघालाच देशातील आणि जगभरातील अधिकृत ध्वज बनवण्याचे कंत्राट दिले जातो. 1957 मध्ये कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाची स्थापना झाली होती.  1982 पासून खादी बनवणं सुरु झाले. दरवर्षी येथे हजारो तिरंगा बनवले जातात.  फेडरेशनला 2005-06 मध्ये ब्‍यूरो ऑफ इंडियन स्‍टँडर्ड्स (BIS) ने सर्टिफिकेशन दिलं होतं. बीआयएस तिरंग्याची क्वालिटी चेक करतात. तिरंग्याची 18 प्रकारची क्वॉलिटी चेक केली जाते. एक छोटासा जरी डिफेक्ट असेल तरी तो ध्वज रिजेक्ट केला जातो.  दरवर्षी येथे 350 हून अधिक लोकं येथे तिरंगा बनवण्याचे काम करतात.  देश आणि विदेशात पाठवले जामारे तिरंगा येथेच तयार केले जातात. महिलांचं येथे मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. 

तिरंगा तयार करण्याची  प्रक्रिया फार  मोठी आहे. सगळ्यात आधी फेडरेशनच्या बागलकोट यूनिटमध्ये हाय क्‍वॉलिटीच्या कच्‍च्या कॉटनचा धागा तयार केला जातो. यानंतर गाडनकेरी, बेलॉरू, तुलसीगिरीमध्ये कपडा तयार केला जातो. कपडा तयार झाल्यानंतर हुबळी युनिटमध्ये डाय आणि इतर प्रक्रिया केल्या जातात. तिरंगा बनवण्यासाठी फक्त कॉटन आणि खादीचा उपयोग केला जातो. क्वॉलिटी चेक झाल्यानंतर तिरंगा बाहेर पाठवला जातो.

तिरंगा तयार करतांना खूप काळजी घेतली जाते. बीआयएस आणि केवीआयसीद्वारे दिलेल्या रंगांचाच यामध्ये वापर केला जातो. कोणता रंग किती प्रमाणात असावा हे देखील निश्चित केलेलं असतं. तिरंगा ध्वजावरील अशोक चक्राचा आकार देखील नियमानुसार ठरलेला असतो. तिरंगा बनवतांना आकार, लांबी, रुंदी आणि इतर सर्व मानदंड लक्षात घेतले जातात. तिरंगा तयार केल्यानंतर तो संबधीत ठिकाणी पोहचवताना देखील विशेष खबरदारी घेतली जाते. हो अगदी काळजीपूर्वक हाताळला जातो.