'आमच्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड वर नका बोलू', अंजली दमानियांना धमकी, पोस्ट करत दिली माहिती

अज्ञातांकडून दमानियांना धमकीचे फोन येत असून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंबाबत न बोलण्याचा धमकी दिली जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केल आहे

शिवराज यादव | Updated: Jan 25, 2025, 10:25 PM IST
'आमच्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड वर नका बोलू', अंजली दमानियांना धमकी, पोस्ट करत दिली माहिती title=

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्यानं आवाज उठवणा-या अंजली दमानियांना धमक्या येऊ लागल्या आहेत. अज्ञातांकडून दमानियांना धमकीचे फोन येत असून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंबाबत न बोलण्याचा धमकी दिली जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केल आहे... नेमकं हे प्रकरण काय आहे, दमानियांना कोण धमकी देतंय.. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

- 'धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर बोलू नका'
- अंजली दमानियांना धमकीचा फोन
- दमानियांना कोण देतंय धमकी?

संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी आवाज उठवला होता. दमानियांनी सातत्यानं या प्रकरणातल्या आरोपींविरोधात मोर्चा उघडला होता. मात्र आता अंजली दमानियांनाच धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अंजली दमानिया यांना फोन करून धमकी देण्यात आल्याचं समोर आलंय. स्वत: दमानियांनीच ट्विट करून याबाबतची माहिती दिलीय. आमच्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर बोलू नका, असं धमकी देणा-यानं सांगितल्याचा दावा अंजली दमानियांनी केलाय.

अंजली दमानियांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरलं होतं. वाल्मिक कराडच्या राजकीय कनेक्शनवरूनही अंजली दमानियांनी गंभीर आरोप केले होते. यापूर्वीही दमानियांना पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी धमक्या दिल्या होत्या. सोशल मीडियावर दमानियांचा मोबाईल क्रमांकही जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अंजली दमानियांना धमकी देण्यात आली आहे. दमानियांना धमकी देणारे कोण, याचा तपास आता लागणार का, हे पाहावं लागणार आहे.