Mahmud Begada: इतिहासात अनेक राजा महाराजा तसेच सुलतान होऊन गेले. शौर्य आणि पराक्रम यासह अनेक राजे महाराजे हे त्यांच्या खास वैशिष्ट्यांमुळे आजही चर्चेत आहेत. यापैकीच एक आहे सुलतान महमूद बेगडा (Mahmud Begada). इतिहासातील विषारी सुलतान अशी त्याची ओळख आहे. हा सुलतान ज्या स्त्रीसह शारीरिक संबंध बनवायचा त्या स्त्रीचा मृत्यू व्हायचा. इतकचं नाही तर एकादी माशी जरी या सुलतानच्या अंगवार बसली तरी माशी देखील मरायची इतका हा राजा विषारी होत.
सुलतान महमूद बेगडा याचे पूर्ण नाव अबुल फत नासिर-उद-दीन महमूद शाह प्रथम असे आहे. या सुलतानचे थेट कनेक्शन गुजरातशी आहे. अतिश खुनशी अशा स्वभावाच्या या राजाचे जेवण देखील राक्षसी होता. हा राजा एकावेळेस 37 किलो अन्न तसेच 150 केळी खायचा. पोर्तुगीज प्रवासी बाबोसा यांनी आपल्या 'द बुक ऑफ ड्युरेट बाबोसा खंड 1' या पुस्तकात या विषारी राजाचा उल्लेख केला आहे.
महमूद बेगडा याला लहानपणी विष पाजून त्याचे पालनपोषण करण्यात आले. कोणी विष देऊन महमूदला मारण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर या विषाचा कोणताही परिणाम होऊ यासाठी त्याला लहानपणीच थोडे विष देण्यात आले. महमूदला त्याच्या जेवणात सौम्य विष मिसळून दिले जात होते. यामुळे महमूदचे संपूर्ण शरीर विषारी झाले असे 'द बुक ऑफ ड्युरेट बाबोसा खंड 1' या पुस्तकात म्हंटले आहे.
सुल्तान महमूद बेगडा याच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलेचा मृत्यू व्हायचा. महमूदच्या अंगावर माशी जरी बसली तरी या माशीचा मृत्यू व्हायचा असा दावा द बुक ऑफ ड्युरेट बाबोसा खंड 1' या पुस्तकात करण्यात आला आहे.
इटालियन प्रवासी लुडोविको डी वर्थेमा याने देखील त्याच्या 'इटिनेरिओ डी लुडोविको डी वर्थेमा बोलोग्निस' या पुस्तकात सुल्तान महमूद बेगडा याच्या विषारी असण्याचा उल्लेख केला आहे. सुल्तान महमूद बेगडा इतका विषारी होता की सुपारी खाल्ल्यानंतर जर एखाद्यावर थुंकला तर त्या व्यक्तीचा मृत्यू व्हायचा.
सुल्तान महमूद बेगडाबद्दल अशीही एक कथा चर्चेत आहे की त्याची भूक राक्षसासारखी होती. तो दिवसाला 35 किलो अन्न खात असे. तो एका वेळी 150 केळी खाऊ शकतो.
सुल्तान महमूद बेगडा याचे गुजरातशी थेट कनेक्शन आहे. गुजरातमधील पावागड येथील कालिका माता मंदिर गुजरातच्या सुलतान महमूद बेगडा यांनी नष्ट केले आणि पीर सदनशाहच्या दर्ग्यात रूपांतरित केले होते. दोन वर्षांपूर्वी याच मंदिरात पीएम मोदींनी तब्बल 500 वर्षांनंतर ध्वज फडकावला.