Padma Awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. आरोग्य, खेळ, कला, साहित्य तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा पद्म पुरस्काराने सम्नान केला जातो. पद्म पुरस्कारामध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री या तीन पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तिघांना पद्मभूषण तर 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 139 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात 23 महिला, 10 परदेशी आणि 13 मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश आहे.
मनोहर जोशी, पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ, अच्युत पालव, चैत्राम पवार यांच्यासह मारुती चितमपल्ली यांच्यासह 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
राष्ट्रपती यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2024’ आज जाहीर झाले. महाराष्ट्रातील शशिकांत रामकृष्ण गजबे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार दादाराव गोविंदराव पवार, ज्ञानेश्वर मुकुंदराव भेदोडकर, यांना जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्यामध्ये साहित्यिक मारुती चितमपल्ली, वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये मोठं योगदान असणारे चैत्राम पवार तसेच प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे.
देशातील 49 नागरीकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यातील 17 नागरीकास ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. यामध्ये पाच व्यक्तींना मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. देशातील 09 जणांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले असून एका व्यक्तींस मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ एकूण 23 जणांना जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्राच्या नागपूर मधून डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. होमिओपॅथीच्या क्षेत्रात समर्पण भावनेने केलेली रुग्णसेवा, रुग्णसेवा करताना जपलेली नैतिक मूल्ये, समाज आणि रुग्णांप्रति असलेली आस्था व जबाबदारीची ठेवलेली जाणीव आदी बाबी विचारात घेऊन डॉ. विलास डांगरे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
हरिमन शर्मा, जुम्दे योमगम गॅमलिन, जॉयनाचरण बथारी, नरेन गुरुंग, विलास डांगरे, सैखा एझ अल सबा, निर्मला देवी, भीम सिंग भावेश, राधा बहन भट्ट, सुरेश सोनी, पंडी राम मानवी, जोनास मासेट्टी, जगदीश जोशिला, हरविंदर सिंग, भेरू सिंह चौहान, वेंकप्पा अंबाजी सुगतकर, पी दच्चनामूर्ती, निरजा भाटला, मारुती भुजंगराव चितमपल्ली, भीमव्वा दोड्डाबलप्पा सिल्कायतारा, सॅली होळकर, गोकुळ चंद्र दास, चैत्राम पवार यांना हा पुसस्कार जाहीर झाला आहे.