सनी लिऑनचं हनी सिंहला चॅलेंज

 बॉलिवूडमध्येही सध्या एएलएस आइस बकेट चॅलेंज स्पर्धेची धूम आहे. अनेक कलाकारांनी हे चॅलेंज पूर्ण ही केलंय. मग अभिनेत्री सनी लिऑन ही तरी कशी मागे राहणार. तिने ही हे चॅलेंज पूर्ण केलंय. 

Updated: Aug 24, 2014, 09:07 PM IST
सनी लिऑनचं हनी सिंहला चॅलेंज title=

मुंबई: बॉलिवूडमध्येही सध्या एएलएस आइस बकेट चॅलेंज स्पर्धेची धूम आहे. अनेक कलाकारांनी हे चॅलेंज पूर्ण ही केलंय. मग अभिनेत्री सनी लिऑन ही तरी कशी मागे राहणार. तिने ही हे चॅलेंज पूर्ण केलंय. 

बर्फाच्या पाण्यानं आंघोळ करण्याचं हे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर तिनं आपला मित्र आणि रॅपर यो यो हनी सिंहला हे चॅलेंज केलंय.  

सनीनं ट्विटरवर व्हिडिओ पण शेअर केलाय. सनीनं सांगितलं, ‘तिचं कुटुंब आणि काही ट्विटर फॅन्सने तिचंही नाव या आइस बकेट चॅलेंजसाठी नॉमिनेट केलं होतं. मी हे चॅलेंज स्वीकारलं.’ 

सनीनं सांगितलं, आता मी यो यो हनी सिंहला नॉमिनेट करतेय. 24 तासांनंतर रिझल्ट पाहू. या आधी हे चॅलेंज रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, बिपाशा बसू, सोनाक्षी सिन्हा, सानिया मिर्झा, ज्वाला गुट्टासह अनेक सेलिब्रिटींनी ही पूर्ण केले आहे.