'आलिया-सिद्धार्थ'ची 'शुभमंगल'ची तयारी

बॉलीवूडची युवा अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील संबंधांवर आजकाल जोरदार चर्चा आहे. या दोन्ही जणांच्या  डेंटिंगच्या बातम्याही समोर येत आहेत. आलिया-सिद्धार्थ अनेक वेळा बाहेर फिरतांना दिसून आले आहेत, कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

Updated: Sep 23, 2015, 05:20 PM IST
'आलिया-सिद्धार्थ'ची 'शुभमंगल'ची तयारी title=

मुंबई : बॉलीवूडची युवा अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील संबंधांवर आजकाल जोरदार चर्चा आहे. या दोन्ही जणांच्या  डेंटिंगच्या बातम्याही समोर येत आहेत. आलिया-सिद्धार्थ अनेक वेळा बाहेर फिरतांना दिसून आले आहेत, कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

असं म्हटलं जातंय की, सिद्धार्थ आणि आलिया यांचं चांगलंच जुळून येतंय, या दोन्ही जणांच्या संबंधांचा अजून कुणीही खुलासा केलेला नाही. सिद्धार्थने म्हटलंय की काही खासगी बाबी या त्या लोकांसाठी खूप पवित्र असतात. आलियाने लग्नाच्या बाबतीत म्हटलंय की मी अजून २२ वर्षांची आहे, मला अजून खूप काही करायचंय.

काही दिवसांपूर्वी एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये सिद्धार्थचे आई-वडिल आले होते, त्यांना भेटण्यासाठी आलिया भट्ट गेली होती. त्यांच्या सोबत डीनरही केलं मात्र याचे कोणतेही फोटो बाहेर आले नाहीत, सिद्धार्थला या विषयी विचारल्यावर तो म्हणाला अजून मी ३० वर्षांचाच आहे, असं उत्तर त्याने दिलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.