'प्रश्नासाठी टाळ्या... भावनिक प्रश्न' ऐश्वर्याबद्दलच्या प्रश्नावर सलमानचं उत्तर

सुपर स्टार सलमान खानला त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय बच्चन 'बिग बॉस-9' या रिअॅलिटी शोच्या कार्यक्रमात येईल का? हा प्रश्न विचारला असता. त्यानं हा खूप 'भावनिक प्रश्न केलाय' असं उत्तर दिलं.

Updated: Sep 29, 2015, 09:41 AM IST
'प्रश्नासाठी टाळ्या... भावनिक प्रश्न' ऐश्वर्याबद्दलच्या प्रश्नावर सलमानचं उत्तर title=

लोणावळा: सुपर स्टार सलमान खानला त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय बच्चन 'बिग बॉस-9' या रिअॅलिटी शोच्या कार्यक्रमात येईल का? हा प्रश्न विचारला असता. त्यानं हा खूप 'भावनिक प्रश्न केलाय' असं उत्तर दिलं.

आणखी वाचा - Confirmed! Bigg Boss 9 दिसणार ११ ऑक्टोबरपासून

बिग बॉसचा हा नववा सिझन सलमान खान होस्ट करतोय. मिळालेल्या माहितीनुसार काही वर्षांच्या ब्रेकनंतर ऐश्वर्या पुन्हा मोठ्या पडद्यावर येतेय. तिच्या 'जज्बा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती 'बिग बॉस'मध्ये येऊ शकते, अशी माहिती मिळतेय. 

याबाबतच विचारलं असता सलमान म्हणाला, 'पीआर वाल्यांकडून माइक दूर करण्यापूर्वीचा हा अखेरचा प्रश्न हवा होता. या प्रश्नासाठी टाळ्या... भावनिक प्रश्न केला.'

आणखी वाचा - व्हिडिओ : 'बिग बॉस9'च्या दुसऱ्या प्रोमोत सलमानचा 'डबल ट्रबल'!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.