विष्णु चाटेच्या फोनमध्ये असं आहे तरी काय? नाशिकमध्ये स्वतःच फेकला मोबाईल

Beed Case Update: बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग आला असला तरी अद्याप पोलिसांना विष्णु चाटे याचा फोन सापडला नाहीये. 

विशाल करोळे | Updated: Jan 12, 2025, 09:08 AM IST
विष्णु चाटेच्या फोनमध्ये असं आहे तरी काय? नाशिकमध्ये स्वतःच फेकला मोबाईल title=
Beed sarpanch murder vishnu chate mobile still missing

Beed Case Update: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आत्तापर्यंत तपासाला वेग आला आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी पाच मोबाइल जप्त केले आहेत. तर हे सर्व जप्त केलेले मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मात्र आरोपी विष्णू चाटे याच्या मोबाईलचं गूढ वाढलं आहे. मात्र आरोपी विष्णु चाटे याचा मोबाईल मात्र अद्याप 'सीआयडी'ला सापडला नाहीये. 

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या मोबाईलचं गूढ वाढलं आहे. आरोपी विष्णू चाटे यानं नाशिकमध्ये स्वत:चा मोबाईल फेकून दिलाय. मात्र त्यानं हा मोबाईल नेमका कुठे फेकला ते ठिकाण आठवत नसल्याचं विष्णू चाटे सांगत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्यामुळे चाटेचा मोबाईल CIDला यंत्रणेला सापडत नाहीये. 

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आतापर्यंत 5 मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत. मात्र विष्णू चाटेच्या मोबाईलवरुनच त्याने वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय आहे. त्याच मोबाईलवरुन खंडणीची धमकी देण्यात आली होती.त्यामुळे विष्णु चाटे याने फेकलेला मोबाईल महत्त्वाचा आहे.  

विष्णु चाटे याचा मोबाईल अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण विष्णु चाटे याच्या फोनवरुन वाल्मिक कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलला होता. त्यावरुन त्याने 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती तेव्हाच त्याने हातपाय तोडण्याची धमकीदेखील दिली होती. या प्रकारच्या ऑडियो क्लिप पोलिसांना सापडल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळं तपासाला वेग येण्यासाठी विष्णु चाटे याचा फोन अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. फरार असताना विष्णु चाटे हा नाशिकमध्ये होता. तिथेच त्याने फोन कुठेतरी फेकला आहे. मात्र फोन कुठे फेकला हे तो सांगत नाहीये. यामुळं मोबाइल शोधण्याचे मोठं अव्हान पोलिसांसमोर असणार आहे. 

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील चौकशीला वेग आला आहे. विष्णू चाटेला उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार आहेत. मात्र कृष्णा आंधळे अद्याप फरार असून राज्याबाहेरही सीआयडी पथक त्याचा शोध घेत आहेत.