Nithya Menen Period Cramps : दाक्षिणात्य अभिनेत्री नित्या मेनन कायम तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. ती लवकरच 'कधलिक्का नेरामिलई' या आगामी चित्रपटाची तयारी करत असल्याचं दिसत आहे. स्टार मीडियाशी बोलताना त्यांनी याविषयी सांगितलं. नित्यानं चित्रपटसृष्टीविषयी काही गोष्टींवर स्पष्ट वक्तव्य केलं. नित्यानं अनेकदा इंडस्ट्रीला अमानवीय म्हटलं आहे. त्यांनी हा देखील खुलासा केला की जेव्हा तिला पीरियड क्रॅम्प्स येत असल्यानं शूटिंगच्या सेटवर उशिरा पोहोचली तेव्हा दिग्दर्शक मॅसस्किननं तिला अशी वागणूक दिली की त्यानं तिला सुद्धा धक्का बसला.
सिनेमा विकटनला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीमधील लोकांच्या माइंडसेटला घेऊन वक्तव्य केलं. तिनं सांगितलं की 'अनेकदा तब्येतीची काळजी न करता कलाकारांना परफॉर्म करायला हवं अशी आशा करतात. याविषयी सविस्तर नित्या म्हणाली, चित्रपटांमध्ये थोडी निर्दयात असते. तुम्ही कितीपण आजारी असलात किंवा कितीही कठीण असलं तरी तुमच्याकडून अपेक्षा केली जाते की तुम्ही समोर आलात आणि परफॉर्म केलं. आम्हाला त्याची सवय झाली आहे. म्हणजे काहीही झालं तरी आम्हाला संघर्ष करायचा आहे.'
नित्यानं 2020 च्या थ्रिलर 'सायको' वर चित्रपट दिग्दर्शक मॅसस्किनसोबत काम करण्याचं असं कारण सांगितलं जे पूर्णपणे वेगळं आहे. शूटिंगच्या पहिल्या दिवशी, तिला मासिक पाळी आली आणि तिला खूप त्रास होऊ लागला. खूप हिंम्मत करत तिनं तिची परिस्थिती समजवण्यासाठी मॅसक्सिनशी बोलली. हे पाहून तिला आश्चर्य झालं की दिग्दर्शक तिच्या गोष्टी समजतात. नित्यानं सांगितलं की पहिल्यांदा मी एक पुरुष दिग्दर्शकाला सांगितलं की मला मासिकपाळी आली आहे.'
नित्यानं पुढे सांगितलं की त्यांनी विचारलं की 'पहिला दिवस आहे का? तेव्हा मला वाटलं की त्यांना इतकं कळतं आणि त्यांना काळजी आहे. त्यांनी म्हटलं की तू आराम करु शकतेस. काही करु नकोस ते संपतील तेव्हा ये.' त्यांच्या या बोलल्यानं किंवा वागणूकीनं नित्याला खूप चांगलं वाटलं. कारण हे इतर लोकांपेक्षा पूर्ण वेगळं होतं.
मॅसक्सिननं लगेच उत्तर दिलं की 'त्यांना एक आई, पत्नी आणि मुलगी देखील आहे. ज्यामुळे ते ही गोष्ट समजू शकतात.' त्यांनी म्हटलं की अशा प्रकारच्या निर्दयी गोष्टींमुळे विचार करण्यास भाग पाडलं. तर चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर 'कधलीका नेरामिल्लई' 14 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय किरुथिगा उद्यनिधीच्या चित्रपटात जयम रवि, योगी बाबू, विनय राय, जॉन कोककेन आणि लाल देखील आहे.