हॅप्पी बर्थ डे लतादीदी! दीदींनी जागवलेल्या खास आठवणी ऐका

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 86वा वाढदिवस आहे. 28 सप्टेंबर 1929ला लता मंगेशकर यांचा जन्म झाला. आपल्या देशाची शान असलेल्या या महान गायिकेला जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

Updated: Sep 28, 2015, 12:54 PM IST
हॅप्पी बर्थ डे लतादीदी! दीदींनी जागवलेल्या खास आठवणी ऐका  title=
Pic courtesy: @mangeshkarlata

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 86वा वाढदिवस आहे. 28 सप्टेंबर 1929ला लता मंगेशकर यांचा जन्म झाला. आपल्या देशाची शान असलेल्या या महान गायिकेला जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

20 भारतीय भाषांत गाणी
 
भारतातील सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' मिळवणाऱ्या लतादीदी या दुसऱ्या गायिका आहेत.  त्यांच्या अजरामर गाण्यांनी जवळपास सात दशकं रसिकांना भुरळ घातली आहे. त्यांच्या नावाची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही घेतली गेली आहे. चित्रपटसृष्टीतील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कारानेही लतादीदींना गौरवण्यात आलं आहे. लतादीदींचा हा सांगितिक ठेवा वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांनी समृद्ध आहे. आजवर 20 भारतीय भाषांत त्यांनी गाणी गायली आहेत. केवळ भारतात नव्हे तर जगभरातील रसिकांवर या आवाजाची मोहिनी आहे.

लतादीदी यांनी आपले वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याबद्दल जागवलेल्या या आठवणी ऐका... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.