'कुंग फू योगा'मध्ये आमीर खान आणि जॅकी चॅन एकत्र

भारत आणि चीनमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात होत असतानाच आता बॉलीवूड आणि चीनमधील सिनेसृष्टीतही 'हिंदी चीन भाई भाई'चे वारे वाहू लागले आहे. 

Updated: May 15, 2015, 05:07 PM IST
'कुंग फू योगा'मध्ये आमीर खान आणि जॅकी चॅन एकत्र title=

बीजिंग: भारत आणि चीनमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात होत असतानाच आता बॉलीवूड आणि चीनमधील सिनेसृष्टीतही 'हिंदी चीन भाई भाई'चे वारे वाहू लागले आहे. 

चीन आणि भारताच्या संयुक्त निर्मितीतून 'कुंग फू योगा' हा चित्रपट साकारला जाणार असून या चित्रपटात आमीर खान आणि जॅकी चॅन ही जोडी प्रमुख भूमिकेत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीन दौऱ्यावर असून दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. तर दुसरीकडे आमीर खानचा पीके हा चित्रपटही चीनमधील प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमीरही चीनमध्ये गेला आहे. 

आमीर खान हा चीनमध्ये बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार आहे. तर अ‍ॅक्शन हिरो जॅकी चॅन हा भारतात चांगलाच लोकप्रिय आहे. हाच दुवा हेरुन भारत - चीननं संयुक्तरित्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

'कुंग फू योगा' असे या चित्रपटाचे नाव असेल आणि यात चिनी मार्शल आर्ट्स आणि भारतीय संस्कृतीचा मिलाप बघायला मिळणार आहे. आमीर आणि जॅकी चॅन ही जोडी प्रथमच एकत्र पडद्यावर दिसणार असल्यानं आत्तापासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.