'रणबीर सोबत लग्न करू नको', दीपिकाचा कतरिनाला सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं मिळालेली संधी न गमावत आपल्या मनातली गोष्ट कतरिना कैफला सांगितली. दीपिकानं कतरिनाला रणबीर कपूस सोबत लग्न न करण्याचा सल्ला दिला. 

Updated: Jan 13, 2015, 10:25 PM IST
 'रणबीर सोबत लग्न करू नको', दीपिकाचा कतरिनाला सल्ला title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं मिळालेली संधी न गमावत आपल्या मनातली गोष्ट कतरिना कैफला सांगितली. दीपिकानं कतरिनाला रणबीर कपूस सोबत लग्न न करण्याचा सल्ला दिला. 

मुंबईमध्ये आयोजित एका अॅवॉर्ड सोहळ्यात जिथं बॉलिवूडचे अनेक तारे हजर होते. या कार्यक्रमात दीपिकाला जेव्हा एका फनी व्हिडिओमध्ये सहभागी होण्यास सांगितलं तर ती तयार झाली. तिला त्यात विचारलं गेलं की, कतरिना कैफला तू काय सांगू इच्छिते, तर तिनं लगेच 
'Do Not Marry Ranbir kapoor' असं म्हटलं. 

दीपिकानं आपल्या मनातली गोष्ट तर यानिमित्तानं कतरिनाला सांगितली नाही. कधी काळी दीपिका कतरिना कैफवर जळत होती. दीपिका आणि रणबीरच्या अफेअरनं खूप चर्चा मिळवली होती. 

काही दिवसांपूर्वी रणबीर आणि कतरिनाच्या गुपचूप साखरपुड्याची बातमीही प्रसिद्ध झाली होती. पण कतरिनानं या बातम्यांचं खंडण केलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.