ब्रिस्बेन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झालेत. ब्रिस्बेन विमानतळावर मोदींचं ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं.
ब्रिस्बेनमध्ये आजपासून दोन दिवस चालणाऱ्या जी - २० समिटमध्ये ते सहभागी होतील. १७ तारखेला सिडनीला जातील. तिथं अन्य कार्यक्रमांबरोबरच ऑलफोन्स अरेनामधली त्यांची जंगी सभा हा आकर्षणाचा विषय असेल.
ऑस्ट्रेलियातही ‘मोदी’नामाचा महिमा...
म्यानमारनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेप्रमाणं ऑस्ट्रेलियातही ते अनिवासी भारतीयांना उद्देशून भाषण करणार आहेत. मोदींच्या आगमनापूर्वीच कांगारूंच्या देशातही मोदी नामाचा महिमा गाजताना दिसला...
ऑस्ट्रेलियातला जगप्रसिद्ध ऑलफोन्स अरेनामध्ये जगभरातले रॉकस्टार्स आपल्या अदाकारीनं रंग भरतात... मात्र यावेळी ऑलफोन्समध्ये धूम असेल ती पोलिटिकल रॉकस्टार... नरेंद्र मोदी यांची...
मेडिसन स्क्वेअरमधला नरेंद्र मोदींचा करिश्मा साऱ्या जगानं पाहिलेलाच आहे... मोदींची ही जादू ऑस्ट्रेलियाच्या ऑलफोन्समध्येही चालणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
आयोजकांचा दावा आहे की, ऑलफोन्स अरेनातला कार्यक्रम मेडिसन स्क्वेअरपेक्षाही झक्कास आणि दमदार असेल. एका तासाचा सांस्कृतिक जल्लोष... त्यानंतर मोदींचं भाषण... ऑलफोन्स अरेनाची क्षमता 16 हजार लोकांची आहे.. मात्र आताच 27 हजाराहून अधिक लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय... ऑस्ट्रेलियाच्या नंबर वन अरेनामध्ये 17 नोव्हेंबरला राजकीय रॉकस्टार मोदींचा जलवा पाहायला मिळणार आहे. इथं सगळीकडे मोदींची पोस्टर लावली जातायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.