रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन १० दिवसांपासून बेपत्ता

जगातल्या शक्तिशाली देशांपैकी एक अशी रशियाची ओळख आहे. याच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. गेल्या सात दिवसांत व्लादिमीर पुतिन यांचे अनेक कार्यक्रम पूर्वनियोजित होते. मात्र त्यापैकी कुठल्याच कार्यक्रमाला पुतिन हजर राहू शकले नाहीत.

Updated: Mar 15, 2015, 04:22 PM IST
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन १० दिवसांपासून बेपत्ता title=

मॉस्को: जगातल्या शक्तिशाली देशांपैकी एक अशी रशियाची ओळख आहे. याच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. गेल्या सात दिवसांत व्लादिमीर पुतिन यांचे अनेक कार्यक्रम पूर्वनियोजित होते. मात्र त्यापैकी कुठल्याच कार्यक्रमाला पुतिन हजर राहू शकले नाहीत.

मीडिया रिपोर्टनुसार पुतीन यांच्या आरोग्याबाबतही बोललं जातंय. सोशल मीडियामध्ये चर्चा आहे की, पुतीन स्ट्रोकचा शिकार बनलेत. तर काही रिपोर्टनुसार त्यांच्या प्रेयसीच्या मुलाच्या जन्मासाठी स्वित्झर्लंडला गेलेत. तर काहींच्या मते तख्तापालटासाठी त्यांना क्रेमलिनने कुठे बंधक बनवून ठेवलं असेल... काही जणं तर ६२ वर्षीय पुतीन यांचं निधन झाल्याचंही म्हणतायेत.  

दरम्यान नुकतीच पुतिन यांची तीन छायाचित्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. मात्र या छायाचित्रांच्या सत्यतेची अजून खातरजमा होऊ शकलेली नाही. त्यामुळे पुतिन यांच्या अशाप्रकारे अज्ञातवासाबाबत, वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

सध्या व्लादिमीर पुतिन अज्ञातवासामध्ये असले तरी, अशाप्रकारे गायब होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. या आधी सुद्धा पुतिन काही कारणांमुळे अशाचप्रकारे काही दिवसांसाठी अज्ञातवासात गेले होते. 

मात्र पुतिन अशाप्रकारे सार्वजनिक रुपात देशासमोर न येण्याचा यावेळचा कालखंड मात्र आधीच्या दोन घटनांपेक्षा निश्चितच जास्त आहे. त्यामुळे रशियासह, आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चांना उधाण आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.