ग्रहावर खाऱ्या पाण्याचा महासागर - नासा

गुरुचा सगळ्यात मोठा उपग्रह असलेल्या गॅनीमिडे या ग्रहावर, खाऱ्या पाण्याचा महासागर असल्याचे पुरावे सापडल्याचा दावा नासा अंतराळ संशोधन संस्थेनं केलाय. 

Updated: Mar 14, 2015, 08:48 PM IST
ग्रहावर खाऱ्या पाण्याचा महासागर - नासा title=

वॉशिंग्टन : गुरुचा सगळ्यात मोठा उपग्रह असलेल्या गॅनीमिडे या ग्रहावर, खाऱ्या पाण्याचा महासागर असल्याचे पुरावे सापडल्याचा दावा नासा अंतराळ संशोधन संस्थेनं केलाय. 

गॅनीमिडे या उपग्रहाच्या बर्फाच्छादित आवरणाखाली हा खाऱ्या पाण्याचा साठा असल्याचा दावा नासानं केलाय. विशेष म्हणजे हा महासागर ६० मैल जाडीचा असल्याचा अंदाज, नासानं मांडलाय. जो पृथ्वीवरच्या एकूण सागरापेक्षा दहापट खोल असल्याचंही नासानं म्हंटलंय. मात्र हा सगळा साठा तब्बल ९५ मैल बर्फाच्या खाली दडलेला असल्याचंही नासानं स्पष्ट केलंय.

गॅलिलिओ अवकाशयानातून अत्यंत प्राथमिक स्तरावरचा हा निरीक्षणात्मक पुरावा हाती आलाय. गॅनीमिडेवर महासागर असल्याचा अंदाज १९७० पासूनच वैज्ञानिक वर्तवत होते. आता या नव्या माहिदतीमुळे पृथ्वी पलिकडेही जीवसृष्टी असल्याच्या दाव्याला पुन्हा एकदा बळ मिळालंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.