... त्यांनी चक्क नोबेल पदकच विकले!

आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा नोबेल पुरस्कार लिलावाच्या माध्यमातून विकत घेता आला तर... ही घटना केवळ कल्पनाच तसंच अविश्वसनिय वाटावी अशी असली तरी जीवशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार मिळालेल्या जेम्स वॉटसन यांनी ती लिलावातून सत्यात उतरविली आहे. 

Updated: Dec 7, 2014, 08:27 AM IST
 ... त्यांनी चक्क नोबेल पदकच विकले! title=

लंडन: आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा नोबेल पुरस्कार लिलावाच्या माध्यमातून विकत घेता आला तर... ही घटना केवळ कल्पनाच तसंच अविश्वसनिय वाटावी अशी असली तरी जीवशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार मिळालेल्या जेम्स वॉटसन यांनी ती लिलावातून सत्यात उतरविली आहे. 

नोबेल पुरस्काराच्या मिळणाऱ्या रक्कमेतून वॉटसन हा पैसा सामाजिक कार्य आणि विज्ञान संशोधनासाठी देणगी म्हणून देणार आहेत. जगात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे की, एखाद्या नोबेल विजेत्यानं आपला पुरस्कार लिलावाद्वारं विकून टाकला आहे. अनुवांषिक बांधणीसाठी (डीएनए) संशोधनात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या जीवशास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांना १९६२ साली नोबेल पुरस्कार देवून गौरविण्यात आलं होतं. त्यांना मिळालेला नोबेल पुरस्कार वॉटसन यांनी लिलावाद्वारे ४.७ मिलियन डॉलरला विकला. 

दूरध्वनी करून बोली लावणाऱ्या एका अज्ञात इसमानं या पुरस्कारासाठी तब्बल ३० कोटी रूपये मोजले. गुरूवारी  न्यूयॉर्कमधील क्रिस्टीज लिलावामध्ये ही बोली लावण्यात आली. एकेकाळी जेम्स वॉटसन यांचे मित्र असलेले फ्रान्सिस क्रिक यांच्या नोबेल पदकाची बोली २.२ मिलियन डॉलर लावण्यात आली होती. परंतू वॉटसन यांच्या नोबेल पदकाला मोठी रक्कम मिळाली. 

७ वर्षापूर्वी वॉटसन यांनी वैज्ञानिक समूदायातून वेगळं राहण्याचा प्रयत्न केला होता. वॉटसन यांनी त्यावेळी आफ्रिकाबद्दल अपशब्द बोलले होते. आपली सर्वच सामाजिक धोरणं या आधारावर बनली आहेत की, त्यांचा बुध्दीचा स्तर आपल्याइतकाच आहे. परंतू सर्व चाचण्या सांगतात की, असं मुळीच होत नाही. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वॉटसन यांनी माफी सुध्दा मागितली होती. वॉटसन यांच्या अन्य दोन हस्तलिखित असलेल्या दस्तावेजचा सुध्दा यावेळी लिलाव करण्यात आला असून यासाठी ६१,०००० डॉलर मिळाल्याची माहिती क्रिस्टीज यांनी दिली. 

दरम्यान, जीवशास्त्रात दिलेल्या योगदानाबद्दल १९६२ साली मेडीसनचा नोबेल पुरस्कार फ्रान्सिस क्रिक, जेम्स वॉटसन आणि मॉरिज विल्किन्स या तीन जणांना संयुक्तपणे देण्यात आला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.