भारताने विमानाने मालदीवला पाठविले पाणी

मालदीवमधील जलप्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याने राजधानी मालेमध्ये तीव्र पाणीाटंचाई निर्माण झाली आहे. जवळपास १००,००० पेक्षा अधिक लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीच नसल्याने तेथील नागरिकांची गरज पाहता भारताने तात्काळ पाणी पुरवठा हवाई दलाच्या विमानाने केलाय.

Updated: Dec 6, 2014, 11:23 AM IST

माले : मालदीवमधील जलप्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याने राजधानी मालेमध्ये तीव्र पाणीाटंचाई निर्माण झाली आहे. जवळपास १००,००० पेक्षा अधिक लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीच नसल्याने तेथील नागरिकांची गरज पाहता भारताने तात्काळ पाणी पुरवठा हवाई दलाच्या विमानाने केलाय.

नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असल्याने मालदीव सरकारने भारतानकडे मदतीसाठी हात मागितला. भारताने मदतीचा हात पुढे केलाय. भारताने तेथील लाखाहून अधिक लोकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी आज हवाई दलाच्या विमानासह नौदलाच्या जहाजाद्वारे पाणी पाठविले आहे. त्यामुळे मालेमधील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

उभय देशांतील मैत्रीपूर्ण, घनिष्ठ आणि मजबूत संबंध लक्षात घेऊन भारताने मालदीवच्या पाणी पाठविण्याच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत तत्परतेने पाणी पाठविले. मालदीवचे संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षामंत्री कर्नल (निवृत्त) मोहंमद नाझीम यांनी भारतीय विमानाचे स्वागत केले. भारताने तातडीने दिलेल्या मदतीबद्दल संरक्षणमंत्री नाझीम यांनी भारताचे आभार मानले.

दरम्यान, पाणी संकटावर मालदीवचे नागरिक आणि सरकारला सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्याची माहिती, मालेतील भारतीय उच्चायुक्तालयाने दिली.

माले जल आणि मलनिस्सारण कंपनीच्या एका जनरेटर कंट्रोल पॅनलला ४ डिसेंबर रोजी आग लागली होती. या आगीमुळे शुद्धीकरण प्रकल्पाच्या जनरेटरची केबल खाक होऊन पाणीपुरवठा ठप्प झाला. हे शहर हिंदी महासागरातील सखल बेटावर वसलेय. येथे एकही नैसर्गिक जलस्रोत नाही. त्यामुळे प्रक्रिया युक्त केलेल्या समुद्रातील पाण्यावर नागरिकांना अवलंबून राहावे लागते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.